सोलापूर : दि.१३ (एमडी२४न्यूज) सदर गुन्हयात मयत फुलचंद पवार हे रेल्वे विभागात तत्पुरता स्वरूपी कामास होते व ते राहत असलेल्या ठिकाणी यातील आरोपींना व त्यांच्या घरच्यांना शिवीगाळ करीत असल्याचा संशयावरून आरोपी अनिल पवार,पिंटू पवार व कालिदास पवार यांनी दिनांक २३/६/२०२३ रोजी सुमारे ८:०० वाजेच्या सुमारास मयताच्या घरी जाऊन या सर्वांनी हाताने तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यास ढकलून दिल्याने घरासमोरील चेंबरवर पडुन गंभीर दुखापत होऊन फुलचंद पवार यांचा मृत्यू झाला होता.
सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हे क्रमांक -३८६/२३ अंतर्गत भा.द.वि.कलम अन्वये गुन्हा दाखल केला होता. तसेच यातील आरोपींना दिनांक २५/६/२०२३ रोजी अटक ही झाली होती. आरोपी व फिर्यादी हे एकाच गल्लीत रहवाशी असल्याने व एकमेकांचे घर समोरासमोर असल्याने यातील आरोपी पिंटू पवार याने फिर्यादीचे पती फुलचंद पवार यास तू आम्हाला शिवीगाळ का करतो व तसेच यातील इतर दोन आरोपी हे देखील मयताच्या घरासमोर येऊन दमदाटी करत त्यास हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहण केली होती. फिर्यादी पूनम पवार ही भांडण सोडवायचा प्रयत्न करत असताना देखील तिन्ही आरोपींनी मयतावर हल्ला केला होता व मयत हा भांडण सुरू असताना घरासमोरील ड्रेनेजच्या चेंबरवर पडुन त्यास गंभीर दुखापत ही झाली होती.
फिर्यादीने आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन तिचे पती यांना नान्नज येथील ग्रामीण रुग्णालय येथे प्रथम उपचारासाठी नेले होते पण तेथून त्याला जिल्हा रुग्णालय सोलापूर येथे पाठवण्यात आले होते. त्यानंतर सुमारे तीन दिवसा पर्यंत फुलचंद पवार यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू होते. दिनांक २८/०६/२३ रोजी फुलचंद पवार हे मरण पावले होते.सदरील आरोपी हे सुमारे १८ महिन्यांपासून कोल्हापूर येथील कारागृहात होते. यातील आरोपींनी आपला जामीन अर्ज मे.जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश खुणे यांनी आरोपींचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे. वरील प्रकरणात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड.दत्तात्रेय कापुरे,ॲड.वैभव बोंगे यांनी काम पाहिले.
