Ticker

6/recent/ticker-posts

मनपा मार्फत बेघर व्यक्तीची शोध मोहीम ...

           
सोलापूर मनपा मार्फत बेघर व्यक्तीची शोध मोहीम 
 
सोलापूर शहरातील रस्त्यावर राहणारे,मंदिर व दर्गा परिसर पासपोर्ट कार्यालय परिसर,होम मैदान,स्मार्ट सिटी परिसर,उघड्यावर राहणारे बेघर व्यक्ती यांची शोध मोहीम घेण्यात आली,सापडलेल्या बेघर यांना आपुलकी बेघर निवारा केंद्रात दाखल  करण्यात आले.




 
सोलापूर महानगरपालिका सोलापूर,दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र चालविण्यात येतो,  बेघर व्यक्तीसाठी बेघर निवारा केंद्र कुमठा नाका क्रीडा संकुल मागे सोलापूर येथे कार्यरत आहे,या ठिकाणी  राहण्याची सुयोग्य उत्तम सोय,जेवण,नाष्टा,आदी सुविधा करण्यात आलेल्या आहेत .

 
सोलापूर शहर स्वच्छ करण्याच्या अनुषंगाने व शहरातील वाढत्या थंडीमुळे रस्त्यावर उघड्यावर राहणारे भिक्षेकरी,घर सोडून आलेले वृद्ध महिला पुरुष लहान मुले अशा प्रकारचे  लोक जे रस्त्यावरच आपला उदरनिर्वाह करतात व रस्त्यावरच राहतात अशा सर्व लोकांसाठी सोलापूर महानगरपालिका आपुलकी शहरी बेघर  निवारा केंद्र सोलापूर येथे अशा सर्व बेघर व्यक्ती रस्त्यावरून उचलून निवारा केंद्रात दाखल करण्यात येत आहे,मोहीम आयुक्त शितल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी तैमूर मुलाणी यांचा नियंत्रणाखाली  सोलापूर महापालिका शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलाणी,आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र व्यवस्थापक अशोक वाघमारे,काळजी वाहक राजू गदाग,शक्ती जाधव  नागरी समुह निरीक्षक सत्यजित वडावराव,नागेश क्षीरसागर, वसीम शेख,साईप्रसाद पोळ अरविंद महाले,सागर गायकवाड, अंबादास जाधव,शशिकांत वाघमारे,इफ्तार शेख आदीनी परिश्रम घेतले.