रोशन शिक्षण संकुलात आंतर शालेय क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन मोठया थाटात संपन्न
सोलापूर : महाराष्टट्र राज्य पद्मशाली संघम व लायन्स क्लब सोलापूर सेंट्रलच्या वतीने रोशन शिक्षण संकुल सोलापूर येथे आंतर शालेय क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन संफन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघम कायदा व न्याय विभाग संघमचे अध्यक्ष अँड.श्रीनिवास कटकूर यांचे अध्यक्षतेखाली,प्रधानसचिव यशवंत इंदापुरे,कायदा व न्याय विभाग संघमचे सहसचिव अँड.आकाश आयंची,लायन्स क्लब सोलापूर सेंट्रलचे अध्यक्ष लायन चक्रधर अन्नलदास, सचिव लायन केदार स्वन्ने,लायन चंद्रकांत यादव,प्रशालेचे मुख्याध्यापक बी.जे.इंगळगी व अलहाज ए.डी.शेख उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापिका के.बांगी मॅडम यांचे उपस्थितीत संपन्न झाले. प्रमुख अतिथींच्या हस्ते व्हाॅलीबाॅल क्रीडांगणाचे व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यांत आले.
यावेळी अँड.श्रीनिवास कटकूर यांनी सर्व खेळाडूंचे ओळख करून घेतले. सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. चक्रधर अन्नलदास यांनी खेळाचे महत्व सांगितले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकुलातील मराठी व उर्दू विभागाचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. आभार मूख्याध्यापक इंगळगी सरांनी आभारप्रदर्शन केले.
