Ticker

6/recent/ticker-posts

चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश...


सोलापूर : माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश प्रभाग २६ मधील प्रल्हाद नगर येथे अवंती नगर येथील स्थलांतरित करण्यात आलेले नागरिक यांना सोलापूर महानगरपालिका हद्दीतील प्रल्हाद नगर येथे तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून देऊन तेथे फिरते शौचालय,लाईट साठी इलेक्ट्रिक पोल,लावण्यात आले होते परंतु पोलवर लाईटच नसल्यामुळे संपूर्ण परिसर रात्रीच्या वेळेस अंधारमय असायचे ही बाब संबंधित नागरिक यांनी माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना समक्ष भेटून समस्या सांगितल्या होत्या.


त्यानंतर संबंधित स्थलांतरित नागरिक व पंचवटी नगरातील सुजाण नागरिक यांना घेऊन सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन आज सदर ठिकाणी लाईट लावण्याचे काम चालू झाल्याने स्थलांतरित नागरिक यांनी माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे मनापासून आभार मानत आहेत. तसेच पंचवटी नगरातील लाईटच्या समस्या देखील लवकरच पूर्ण होईल असे संबंधित विभागातील अधिकारी हे सांगत आहेत.