सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात १८४ उमेदवार निवडणूक लढविणार - जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद
एकूण ३३४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेले होते,तर १५० उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली
विधानसभा मतदारसंघ निहाय स्त्री पुरुष मतदार संख्या
जिल्ह्यातील सर्व मतदारांनी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान करण्याचे आवाहन
सोलापूर : दि.०५ (एमडी२४न्यूज) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दिनांक २२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ३३४ उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठी अर्ज भरलेले होते दिनांक ०४ नोव्हेंबर २०२४ अखेरपर्यंत १५० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतलेले असून १८४ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील एकुण ११ विधानसभा मतदार संघामध्ये खालीलप्रमाणे निवडणूक लढविण्याऱ्या उमेदवारांची विधानसभा मतदार संघनिहाय संख्या......
२४४ - करमाळा, एकुण उमेदवार ३१,अर्ज माघारी घेतलेले उमेदवार १६,एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या १५,
२४५- माढा, एकुण उमेदवार ३०,अर्ज माघारी घेतलेले उमेदवार १७,एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या १३,
२४६ - बार्शी, एकुण उमेदवार ३१, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार ११, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या २०,
२४७- मोहोळ (अ.जा), एकुण उमेदवार २७, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार १७, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या १०,
२४८- सोलापूर शहर उत्तर, एकुण उमेदवार २६, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार ०६, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या २०,
२४९- सोलापूर शहर मध्य,एकुण उमेदवार ३९,अर्ज माघारी घेतलेले उमेदवार १९, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या २०,
२५०- अक्कलकोट,एकुण उमेदवार १५,अर्ज माघारी घेतलेले उमेदवार ०३, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या १२,
२५१- सोलापूर दक्षिण, एकुण उमेदवार ४०, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार १५, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या २५,
२५२- पंढरपूर, एकुण उमेदवार ३८, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार १४, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या २४,
२५३- सांगोला एकुण उमेदवार ३२, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार १९, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या १३,
२५४- माळशिरस (अ.जा), एकुण उमेदवार २५, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार १३, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या १२, एकुण उमेदवार ३३४, अर्ज माघारी घेतलेले उमेदवार १५०, एकुण निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या १८४.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदार संघ निहाय मतदान केंद्र व मतदार संख्या-
मतदार संघ २४४-करमाळा,एकुण मतदान केंद्रांची संख्या– ३४७, मतदार-पुरूष १ लाख ७१ हजार ५१५,महिला-१ लाख ५७ हजार ४६८, तृतीयपंथीय -११, एकुण ३ लाख २८ हजार ९९४, सैनिक मतदार-४६७, ८५ वर्षावरील मतदार- ५ हजार ७०५.
मतदार संघ २४५-माढा,एकुण मतदान केंद्रांची संख्या – ३५५, पुरूष १ लाख ८३ हजार ९४८, महिला- १ लाख ६८ हजार ७४०, तृतीयपंथीय -०३, एकुण ३ लाख ५२ हजार ६९१, सैनिक मतदार-३५५, ८५ वर्षावरील मतदार- ५ हजार १८६.
मतदार संघ २४६-बार्शी,एकुण मतदान केंद्रांची संख्या – ३३३, पुरूष १ लाख ७३ हजार ४५३, महिला-१ लाख ६४ हजार २, तृतीयपंथीय -४४, एकुण ३ लाख ३७ हजार ४९९, सैनिक मतदार-५६३, ८५ वर्षावरील मतदार- ६ हजार ८३९.
मतदार संघ २४७- मोहोळ (अ.जा),एकुण मतदान केंद्रांची संख्या – ३३६, पुरूष १ लाख ७३ हजार १२१, महिला- १ लाख ५८ हजार ३२९, तृतीयपंथीय -०८, एकुण ३ लाख ३१ हजार ४५८, सैनिक मतदार-४२४,८५ वर्षावरील मतदार- ५ हजार १५९.
मतदार संघ २४८-सोलापूर शहर उत्तर, एकुण मतदान केंद्रांची संख्या – २८९, पुरूष १ लाख ६२ हजार ४६७, महिला- १ लाख ६६ हजार ५९, तृतीयपंथीय -४६, एकुण ३ लाख २८ हजार ५७२, सैनिक मतदार-८१,८५ वर्षावरील मतदार- ४ हजार १२८.
मतदार संघ २४९- सोलापूर शहर मध्य, एकुण मतदान केंद्रांची संख्या – ३०४, पुरूष १ लाख ७० हजार ५०९, महिला- १ लाख ७६ हजार ११५, तृतीयपंथीय -५३, एकुण ३ लाख ४६ हजार ६७७, सैनिक मतदार-४५,८५ वर्षावरील मतदार- ३ हजार ८०९.
मतदार संघ २५०- अक्कलकोट,एकुण मतदान केंद्रांची संख्या – ३९६, पुरूष १ लाख ९६ हजार ५७७, महिला- १ लाख ८६ हजार ८६९, तृतीयपंथीय -४३, एकुण ३ लाख ८३ हजार ४७९, सैनिक मतदार-४३४,८५वर्षावरील मतदार- ४ हजार ३४२.
मतदार संघ २५१-सोलापूर दक्षिण,एकुण मतदान केंद्रांची संख्या – ३६७, पुरूष १ लाख ९५ हजार ७५१, महिला- १ लाख ८६ हजार ९६४, तृतीयपंथीय -३९, एकुण ३ लाख ८२ हजार ७५४, सैनिक मतदार-२४०,८५ वर्षावरील मतदार-३ हजार ३५६.
मतदार संघ २५२-पंढरपूर, एकुण मतदान केंद्रांची संख्या – ३५७, पुरूष १ लाख ९१ हजार ४६४, महिला- १ लाख ८२ हजार १९४, तृतीयपंथीय -२६, एकुण ३ लाख ७३ हजार ६८४, सैनिक मतदार-५४१,८५ वर्षावरील मतदार- ५ हजार ३३०.
मतदार संघ २५३- सांगोला, एकुण मतदान केंद्रांची संख्या – ३०९, पुरूष १ लाख ७२ हजार ७०४ , महिला- १ लाख ६० हजार ७८४, तृतीयपंथीय -०५, एकुण ३ लाख ३३ हजार ४९३, सैनिक मतदार-८८६,८५ वर्षावरील मतदार- ४हजार २२३.
मतदार संघ २५४- माळशिरस (अ.जा),एकुण मतदान केंद्रांची संख्या – ३५४, पुरूष १ लाख ८० हजार ३२२, महिला- १ लाख ६९ हजार २१४, तृतीयपंथीय -३२, एकुण ३ लाख ४९ हजार ५६८, सैनिक मतदार-४००,८५ वर्षावरील मतदार- ४हजार ६९९.
एकुण मतदान केंद्रांची संख्या – ३ हजार ७३८, पुरूष १९ लाख ७१ हजार ८३१, महिला- १८ लाख ७६ हजार ७२८, तृतीयपंथीय -३१०, एकुण ३८ लाख ४८ हजार ८६९, सैनिक मतदार-४ हजार ४३६,८५ वर्षावरील मतदार- ५२हजार ७६६.
दि. २९/१०/२०२४ रोजी एकूण पुरूष मतदार १९,७१,८३१, स्त्री मतदार १८,७६,७३८ व इतर मतदार ३१० असे एकूण ३८,४८,८६९ एवढे मतदार व ४४३६ सैनिक मतदार आहेत. जिल्हयाचा EP ratio दि. २९ /१० /२०२४ रोजी ७८.६७% एवढा आहे. Gender ratio हा ९५२ आहे. जिल्हयामध्ये १८-१९ वयोगटातील एकूण मतदार १,०४,६३४ (२.७२%) असून २०-२९ वयोगटातील मतदार हे ८,१०,४७१ इतके आहेत. ८५ वर्षावरील मतदारांची संख्या हि ५२,७६६ असून PWD मतदार संख्या हि २९,९८९ इतकी आहे.
सोलापूर जिल्हयामध्ये एकूण मतदान केंद्र ३७३८ (शहरी ११८३ व ग्रामीण २५५५) असून, ३७२३ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत.
आचार संहितेबाबत काही तक्रारी असल्यास त्यासाठी C-vigil app वापरावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर यांनी केले असून Cash seize करणे, liquor seize करणे तसेच इ. तत्सम कामासाठी ESMS app वापरण्यात येणार आहे.
तसेच सोलापूर जिल्हयासाठी एक Control room स्थापन करण्यात आली असून, जिल्हा स्तरावर १९५० हा toll free नंबर हा activate करण्यात येत असून त्याच धर्तीवर मतदार संघ निहाय स्वतंत्र Control room स्थापन करण्यात आलेले आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेण्यासाठी मतदार संघ निहाय एक खिडकी योजना व Suvidha प्रणालीद्वारे अर्ज सादर करणेची सोय करण्यात आली आहे.
जिल्हयातील ११ विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांनी बुधवार दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या मतदानामध्ये आपला सहभाग नोंदवून आपले बहुमूल्य मत मतदानाद्वारे नोंदवून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे,असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.