हैद्रा दर्गात ८९१ व्या उरूसाची तयारी जोमात चेअरमन रफीक मुजावर यांची माहिती; विविध धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ
सोलापूर : दि.२७ (एमडी२४न्यूज) अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथील ख्वाजा पिर सैफुल मुलक दर्गात उरूस निर्मित२७,२८ व२९ नोव्हेंबर रोजी संदल,चिराग आदीसह विविध धार्मीक कार्यकमाचे आयोजन करण्यात आले आहेत. तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टीचे चेअरमन एम.डी.रफीक सिराजोद्दीन मुजावर यानी केले आहे.
अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथील हिदु-मुस्लीम एक्याचे प्रतीक असलेले सुप्रसिद्ध ख्याजा पिर सैपुल मुलक दर्गाचे उरुस दिनांक २७ पासुन प्रारंभ होत असुन दिनांक २८ रोजी गंध (संदल) चा कार्यक्रम पार पडणार आहे. हजारो वर्षाच्या परंपरेप्रमाणे कर्नाटक येथील करजगी गावचे पाटील परीवाराच्या घरातुन गंध निघणार आहे. तसेच ६ वाजता चिराग (दिवा) चा कार्यक्रम तर रात्री ९ वाजता गोरखपुर युपी, येथील नुसरत खानम व पुनाचे कामील चिश्ती यांचा कव्वालीचा मुकाबला होणार आहे. दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी पर्यंत महाप्रसाद चालु राहणार आहे. ख्याजा पिर सैफुल मुलक या दर्गाचे उरुस सलग तिन दिवस चालणार असुन या ऊरुसमध्ये हिंदू-मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.
देश-परदेशातून येणाऱ्या भाविक भक्तांचा हैद्रा येथे प्रचंड गर्दी होत असते. धार्मिक,सामाजिक,शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी प्रत्येक व्यक्ती,कुटुंब व समाज घटक येवून पवित्र दर्यात नवस बोलतात व नवस फेडण्यासाठी लोकसमुहाचा वर्दळ उरूसच्या काळात पाहवयास मिळत असते. सात ते आठ हजार लोकवस्तीच्या हैद्रा या गांवात ख्वाजा पीर सैफुल मुलक दर्गा प्रसिध्दीच्या जोत्यात आला आहे. सर्व जाती धर्माचे प्रतिक म्हणून या दांकडे पाहिले जाते. भाविक भक्तांचा भावनांचा आदर दर्गाह ट्रस्टीकडून जोपासले जातो.
कर्नाटक,महाराष्ट्र सीमेवर वसलेले तीर्थक्षेत्र हैद्रा येथील प्रसिध्द ख्वाजा पीर सैफुलमुलक दग्र्याचे हजारो वर्षापासून चालत आलेले परंपरा करजगी (कर्नाटक) येथील पाटील या कुटुंबाकडून गंध च्या माध्यामातून येवून परंपरा अविरतपणे चालू असल्याची माहिती दर्गाह ट्रस्टीचे चेअरमन एम.डी. रफीक सिराजोद्दीन मुजावर यांनी दिली आहे.
१) संदल दिनांक २७/११/२०२४ बरोज बुधवार संदल (गंध) नंतर फजर,संदल की रवांगी मु.पो. करजगी (कर्नाटक) के पाटील के घर से निकलेगा,नाटक बाद इशा.
२) चिराग (दिवेबत्ती) दिनांक २८/११/२०२४ बरोज जुमेरात,चिराग बाद इशा (दिवे) व कव्वाली का मुकाबला आर्केस्ट्रा बाद इशा.
३) जियारत (प्रसाद वाटप) दिनांक २९ / ११/२०२४ बरोज जुम्मा,जियारत बाद फजर,तबरकु (प्रसाद वाटप) नाटक बाद इशा
यावेळी व्हा.चेअरमन बंदेनवाज तालाबअली मुजावर, सेक्रेटरी वकील नवीसाब मुजावर,ट्रस्टी अहमद कादरबाशा मुजावर, ट्रस्टी अ.रउफ अहमदसाब मुजावर,ट्रस्टी बंदेनवाज शिराजोद्दीन मुजावर,ट्रस्टी याकूबसाब एम.मुजावर,ट्रस्टी जैनोद्दीन तालाबअली मुजावर,ट्रस्टी अय्युब वकील मुजावर,ट्रस्टी अशी माहिती एमडी२४न्यूजशी बोलताना दिली.
