Ticker

6/recent/ticker-posts

माहिती अधिकार कायदा अधिनियम २००५ नुसार तपशील फलक बोर्ड



माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाचे फेडरेशन महाराष्ट्र राज्य इस्माईल शेख सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाचे व्दारे तक्रार व निवेदन पाठपुराव्यामुळे १९ वर्ष पूर्ण झाले असून सुद्धा माहिती अधिकार कायदा अधिनियम २००५ नुसार सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस आयुक्ताला व संबंधित पोलिस स्टेशनच्या हद्दीतील माहिती अधिकार कायदा अधिनियम नुसार तपशील बोर्ड लावण्यात आले नाहीत म्हणून यांची दक्षता घ्यावी.

महाराष्ट्र राज्यातील राज्यपाल प्रधान सचिव मंत्रालय मुंबई व सामान्य प्रशासन विभाग प्रमुख प्रधान सचिव मंत्रालय मुंबई, महाराष्ट्र राज्य चे महासंचालक प्रधान सचिव मंत्रालय मुंबई, गृह विभाग प्रधान सचिव मंत्रालय मुंबई आणि संबंधित महासंचालक अधिनिस्त येणाऱ्या सर्व आयुक्तालय व संबंधित संबंधित सर्व कार्यालयात दर्शनी भागास जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या माहिती अधिकार 2005 अंतर्गत नियमाप्रमाणे बोर्ड लावणे बंधनकारक असल्याने हे तात्काळ लावण्यात यावे अन्यथा येणार काळात संबंधित संबंधित अधिकाऱ्या विरोधात नियमाप्रमाणे कारवाई का करण्यात येऊ नये. असे फेटेशनचे व माहिती अधिकार कार्यकर्ता इस्माईल शेख यांनी एमडी२४न्यूज बोलताना म्हणाले.