Ticker

6/recent/ticker-posts

भाजप नेते यांनी बोगस आदिवासी दाखले तयार करून सुनेचे करोड रुपये हडप...

महाराष्ट्राचे माजी कैबिनेट मंत्री व भाजप नेते मधुकरराव पिचड यांनी बोगस आदिवासी दाखले तयार करून सुनेचे ०५ करोड रुपये हडप केले.

पुणे :  दि०९ (एमडी२४न्यूज)  महाराष्ट्राचे माजी कैबिनेट मंत्री माजी मधुकरराव पिचड यांनी त्यांच्या द्वितीय पत्नी कमळ मधुकर पिचड या आदिवासी नसतांना त्यांचा खोटा व बनावट आदिवासी जातीचा दाखला बनून त्याआधारे वकील असीम सरोदे यांच्या पक्षकार सून सरोज जितेंद्र पिचड यांची संपत्ती हडप करून फसवणूक केली आहे. त्यांची दुसरी पत्नी कमळ पिचड या हिंदू मराठा असताना मधुकर पिचड यांनी बनावट कागदपत्रे तयार करून घेतली,त्याचवेळी सून सरोज जितेंद्र पिचड यांच्या जबरीने अनेक कागदपत्रांवर सह्या आणि स्वतःच्या ओळख्यांचा फायदा घेऊन सरकारी रेकॉर्ड मध्ये फेरफार करून घेतले. बनावट आदीवासी दाखल्याच्या आधारे नावे कमळ पिचड यांच्या नावाने जमिनी फ्रेफर करून घेतल्या. अनायासे त्यासर्व जमीन मिळकती समृद्धी महामार्गात विक्री करून त्याद्वारे शासनाकडून साधारणता पाच करोडो रुपये घेतले आहेत,जे की त्यांची सून सरोज पिचड हिला मिळणे आवश्यक होते. 





तसेच त्याव्यतिरिक्त अन्य शेतकऱ्यांचे देखील मिळकती अशाच प्रकारे बेकायदेशीर बळकवून त्यातून देखील करोडो रुपये मिळविले आहे. त्याबाबत सहआयुक्त अनुसूचित जाती जमाती तपासणी समितीकडे २०१८ साला पासून तक्रारी आहेत. पण सरकारी अधिकारी मधुकर पिचड यांच्या दाबवाखाली वागतात वागत असल्याचे पत्रकार परिषद वकील असीम सरोदे म्हणाले.





या सर्वांबाबत सरोज जितेंद्र पिचड यांनी पोलीस निरीक्षक शहापूर यांच्याकडे रीतसर तक्रार देऊन देखील पोलिसांनी त्याची दखल न घेतल्याने आम्ही जिल्हा व सत्र न्यायालय कल्याण येथे प्रायव्हेट कम्प्लेंट दाखल केलेली आहे. सदर कामी कोर्टाने दखल घेऊन मधुकर पिचड,कमळ पिचड व संबंधितावर कारवाई का केली जाऊ नये याबाबतची नोटीस बजावणीचा आदेश दिलेले आहे. सदर प्रकरणाची पुढील तारीख २५ - ऑक्टोबर रोजी असल्याची माहिती आणि अश्या प्रकारे कमळ पिचड यांनी आदिवासी नसताना आदिवासी जमिनी बेकायदेशीर बळकवून त्यातून करोडो रुपयांचा नफा मिळविला आहे त्यास मधुकर पिचड यांचे राजकीय पाठबळ असून ते सध्या सत्ताधारी भाजप गटामध्ये असल्याने त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नाही. याप्रकरणी न्याय मिळेल याची खात्री सरोज पिचड यांना आहे. मधुकर पिचड व इतर यांच्या विरोधात त्यांची सून सरोज पिचड यांनी कौटुंबिक हिंसाचार काय‌द्यानुसार सुद्धा केस दाखल करण्यात आले असल्याची माहिती वकील सरोदे यांनी दिली.