पुणे : दि.०८ (एमडी२४न्यूज) लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी निर्माण कृती समितीची राज्यस्तरीय बैठक पुण्यातील श्रमिक पत्रकार भवन येथे संपन्न झाली. लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी निर्माण कृती समितीचे मुख्य संयोजक प्राध्यापक डॉ.गौतम बेंगाळे यांनी बैठकीत बोलत असताना म्हणाले की,भारतीय संस्कृती परंपरा जगात श्रेष्ठ आहे. जगाला शांती,अहिंसा,बंधुत्व,समता,न्याय,स्वातंत्र्य या तत्त्वाचा संदेश भगवान बुद्धांनी २६०० वर्ष पूर्वी दिला. भारतभूमी ही तथागत गौतम बुद्धांची जन्मभूमी आहे.
भारतात अहिंसा,बंधूभाव,शांती समता प्रस्थापित करणारा बुद्धाचा विचार भारताबाहेर अनेक देशात विस्तारला गेला. अशा गौरवशाली इतिहास असलेल्या भारतामध्ये लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी असे नाव धारण केलेले किंवा असे नाव असलेले एकही विद्यापीठ भारताच्या भूमीवर नाही,त्यामुळे सरकारने गांभीर्याने विचार करून लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्थापन करून भारतातील ग्रामीण भागाचा विकास साधावा आणि शहराकडे येणाऱ्या लोकसंख्येचा ताण आणि लोढा शहरात होणारे प्रदूषण ग्रामीण भागात विद्यापीठ स्थापन केल्यामुळे वातावरणाचा समतोल राखला जाईल असे बोलताना डाॅ.बेंगाळे म्हणाले.
सदरहून विद्यापीठातून भविष्यात ग्रामीण भागातून चांगले संशोधन व भारताच्या विकासासाठी आदर्श राष्ट्रप्रेमी नागरिक तयार होतील तसेच ऑलिंपिक खेळामध्ये आपल्या देशाला गोल्ड मेडल मिळून देणारे चांगले खेळाडू निर्माण होतील कारण विद्यापीठासाठी ही जागा तालुका पुरंदर मोजे घेरा पुरंदर जिल्हा पुणे येथे आहे अशा स्वच्छ व हवेशीर वातावरणात लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल यूनिवर्सिटी ची स्थापना करून त्या विद्यापीठातून आदर्श राष्ट्रप्रेमी नागरिकांनी भारत मातेसाठी उत्कृष्ट खेळाळूने सक्षम नागरिक निर्माण होतील या संदर्भात २५ फेब्रुवारी २०२२ पासून सातत्याने शासनाकडे पत्रव्यवहार करीत असून या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) संस्थापक अध्यक्ष तथा मंत्री रामदास आठवले आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पत्र मिळाले यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभाग कडून विद्यापीठ स्थापनेची कारवाई करण्यात येईल यासाठीच्या शासकीय जमीन हस्तांतरांची कारवाई महसूल व वनविभागाकडून करण्यात येईल महसूल व वन विभागाकडून सुद्धा याबाबत सकारात्मक प्रतिसाद प्राप्त झालेला आहे. याचबरोबर विविध विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे वरील सर्व माहिती संयोजक प्राध्यापक डॉ.गौतम बेंगाळे राज्यस्तरीय बैठकीत दिली आहे.
या बैठकीला संपूर्ण राज्यातून अनेक मान्यवर सदस्य उपस्थित होते. लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची निर्माण कृती समिती ही अलीकडच्या काळात स्थापन केलेली आहे. राज्यातून अनेक अभ्यासू आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे मान्यवर अशा व्यक्तींना या लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल यूनिवर्सिटी कृती समितीमध्ये समावेश केलेला आहे.
लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल यूनिवर्सिटी कृती समितीची स्थापना लवकरात लवकर कशी करता येईल याविषयी सर्व सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रा.डॉ.गौतम बेंगाळे यांची निस्वार्थ पणे काम करण्याची प्रवृत्ती असून ते जे काम हाती घेतात ते तडीस नेतात अशा भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या.
प्रा.डॉ.बेंगाळे यांनी आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले - यावेळी प्रा.अरूण अंभोरे,रमेश बागले, वासुदेव माळी, उत्तम जाधव, संभाजी बनसोडे, निवृत्ती लोंखडे,भाऊसाहेब भोसले,मिलींदकुमार रणदिवे,संजीवनी कदमसह लॉड बुद्ध इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कृती समितीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.