Ticker

6/recent/ticker-posts

जैन सोशल ग्रुप सेंट्रलच्या वतीने दिवाळीचे साहित्य व कपडे वाटप

जैन सोशल ग्रुप सेंट्रल तर्फे १०० अंध कुटुंबियांना दिवाळीचे साहित्य व कपडे वाटप

सोलापूर : जैन सोशल ग्रुप सेंट्रल तर्फे  लुई ब्रेल अंध सामाजिक संस्थेच्या अंध सदस्य कुटुंबियांना दीपावली निमित्त फराळा चे साहित्य व कपडे देण्यात आले. गुजराती मित्र मंडळाच्या सभागृहात जिल्ह्यातून १०० अंध कुटुंबीय आले होते व त्या सर्वांना दान दात्यांच्या हस्ते संपूर्ण किट व कपड्याचे वाटप केले. सुरवातीस लुई ब्रेल,स्व,महेंद्रभाई शहा व स्व,शामसुंदर तोष्णीवाल यांच्या तैल चित्रास पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.


जैन सोशल ग्रुप चे संस्थापक केतन शहा,अध्यक्ष संजय शहा,संतोषभाभी बंब,अशोक छाजेड,गौतम संचेती,अतुल गांधी,दर्शनाळे सर,उडता, सुरज सोनटक्के,संतोष देशमुख, व्यासपीठावर बिराजमान होते. सर्व दान दाते यांचा लुई ब्रेल संस्थेच्या वतीने पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
नवकार महामंत्राने कार्येक्रमाची सुरवात केली.

संजय भाई शहा याने प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले,,गौतमभाई सांचेतीने मनोगत व्यक्त केले. दमानी अंध शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेची माहिती देऊन महेंद्रभाई शहा व शामसुंदर तोष्णीवाल यांच्या प्रयत्नाने व प्रेमरतन दमानी यांच्या कडून जागा मिळविल्या पासून महानगर पालिके कडून इमारत बांधून कसे अंध विद्यार्थी गोळा केले त्याची माहिती दिली.

संस्थापक केतन शहा यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले हा दिवाळी साहित्य वाटपाचा कार्यक्रम आम्ही मागील सात वर्षांपासून करत आहोत व ह्या पुढे देखील चालू राहील असे सांगून दान दात्याची यादी वाचून दाखवली व २३ वस्तूची किट कशी तयार केली ते सांगितले व भविष्यात कोणतीही मदत लागल्यास आम्ही सर्व जण आपणास जरूर मदत करू असे सांगितले.

ह्या वेळी सुभाष लोणावत,गिरीश गांधी,धन्यकुमार खाबे, प्रदीप,पदंम मेहता,तिलोकचंद बोथरा,भावना शहा,लताबेन शिंगवी,रमेश बंब,लुई ब्रेल संस्थेचे अंजली शेळके,महेश बिराजदार,कामलदीप कुंचिकट्टी,शिवशंकर पाटील,बसवराज तोडकरी ह्यांनी परिश्रम घेतले. सूत्र संचालन संतोष देशमुख यांनी केले व आभार प्रदर्शन सुरज सोनटक्के यांनी मानले.