सोलापूर : प्रभाग २६ मधील रत्नमंजिरी नगर येथे ड्रेनेज लाईनचे उद्घाटन. प्रभाग २६ मधील रत्न मंजिरी नगरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून ड्रेनेज,पाण्याची पाईप,लाईन व अंतर्गत रस्ते झालेले नव्हते. स.न.२०२१ मध्ये तेथील सुजाण नागरिक नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्याकडे सदर नगरा मधील समस्या सांगितल्या होत्या त्याची दखल घेत प्रथम पाण्याची पाईपलाईन व काँक्रीट रस्ते करून दिले होते.
उर्वरित ड्रेनेजचे काम अपूर्ण राहिले होते त्यामुळे तेथील नागरिक यांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना सदर समस्या बाबतीत समक्ष भेटून निवेदन दिले होते त्याची दखल घेत सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना तेथील ड्रेनेज कामासाठी निवेदन दिले होते त्याची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत सदर नगरातील ड्रेनेज लाईन मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
सदर नगरातील पाण्याची पाईपलाईन व ड्रेनेजचे काम झाल्यानंतर शासनाच्या मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत अंतर्गत रस्ते लवकरच सदर नगरात होणार आहेत असे नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांनी सांगितले आहे त्यामुळे सदर नगराचा कायापालट होणार आहे.
सदर उद्घाटन प्रसंगी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे मिस्टर व सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण,निवृत्त पोलीस अधिकारी कांबळे,बिराजदार काका,रामचंद्र पवार,कोळी सर, व त्या नगरातील महिलावर्ग उपस्थित होत्या व त्याने आपले मनोगत व्यक्त केले की आम्ही जवळपास २० ते ३० वर्षापासून सदर नगरामध्ये राहत असून आम्ही नियमितपणे सोलापूर महानगरपालिकेला शंभर टक्के टॅक्स भरत असून आम्हाला सोई सुविधा उपलब्ध होत नाहीत परंतु नगरसेविका चव्हाण ह्या निवडून आल्यापासून आमच्या नगरातील पाण्याची पाईपलाईन,ड्रेनेज,काँक्रीट रस्ते करून दिलेले आहेत उर्वरित कामासाठी त्या सतत शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत अशा ह्या जनतेसाठी धडपडणाऱ्या नगरसेविका आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो असे मनोगत व्यक्त केले.