Ticker

6/recent/ticker-posts

एक गाव एक गणपती मोठ्या उत्साहात साजरा !

एक गाव एक गणपती धामणगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा ! 

सोलापूर : दि.१८ (प्रतिनिधी)  बार्शी तालुका धामणगाव दु येथे एक गाव एक गणपती विविध सांस्कृतिक उपक्रमाने साजरा करण्यात आले. नामवंत व्याख्यानकार प्राध्यापक रोहित देशमुख अकलूजकर खंडोजी डोईफोडे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच पेरे पाटील हास्य सम्राट दीपक देशपांडे विविध गावातील भजनी मंडळ लहान मोठ्या मुलांच्या संगीत खुर्च्या वृक्ष लागवड असे आनंददायी कार्यक्रम घेण्यात आले.

यावेळी वैराग पोलीस स्टेशनचे पीआय निवृत्ती मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार गावातील समस्त तरुण मंडळाने मोलाचे योगदान देऊन एकत्र येऊन गावामध्ये प्रथमच एक गाव एक गणपती असा इतिहास घडवला. मयूर लुंगसे,वैभव देशमुख, प्रशांत देशमुख,प्रथमेश देशमुख, युवराज पाटील, हर्षद कदम, डॉ.राहुल मसाळ, समाधान माने, वैभव पाटील,बंडू देशमुख,  गणेश बोधले, सिकंदर शेख, बाळासाहेब कांबळे,विकास गाडे,अभिजीत गाडे,सुहास सुरवसे,सुनील करंडे, बबलू देशमुख,नवनाथ चव्हाण,योगेश देशमुख, सागर बोधले आदी तरुणानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.