प्राचीन योगाची माहिती,प्रार्थना,पूरक हालचाली मानेच्या, योगासने उभी,बैठक,पाटीवरील,पोटावरील,प्राणायम,ध्यान आदीबाबत माहिती देणारे प्रदर्शन
प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले. केंद्रीय संचार ब्यूरोचे विशेष उपक्रम
सोलापूर : दि.२३ (प्रतिनिधी) आनंदी आणि आरोग्यमय जिवनासाठी नियमित योगासने करणे आवश्यक आहे. आरोग्य हीच आपली धनसंपदा आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस हा आरोग्याची काळजी घेणेचे स्मरण करुन देतो. योगाच्या शास्त्रीय माहितीसाठी केंद्रीय संचार ब्युरोचे मल्टीमिडिया प्रदर्शन अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी आज येथे केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो आणि जिल्हा व पोलिस प्रशासन यांच्यावतीने हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुळे सभागृहात मल्टीमिडिया चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयुक्त तेली उगले प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होत्या.
मंचावर पोलीस आयुक्त राजेंद्र माने, प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे,क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक नितीन धार्मिक, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, योग संस्था निमंत्रक मनमोहन भुतडा, मुख्य समन्वयक सुधा अळळीमोरे, सेवानिवृत्त अधिकारी सतीश घोडके, योग साधना मंडळाच्या रोहिणी उपळाईकर आणि सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव आदी उपस्थित होते.
आयुक्त उगले म्हणाल्या, यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाची वसुधैव कुटूबकमसाठी योग ही संकल्पना आहे. आपले कुटूंब हे संपूर्ण पृथ्वी आहे. आपण या सगळया कुटूंबाची काळजी घेतली पाहिजे. सातसमुद्रापार युनोमध्ये भारताचे पंतप्रधान योगाचे नेतृत्व करत आहेत. याचा सर्वांना अभिमान आहे. योग दिन पुरता मर्यादित न राहता सर्वकाळ निरंतर करावा. असेही आवाहन त्यांनी केले.
यावेळी पोलिस आयुक्त माने म्हणाले,केंद्रीय संचार ब्युरोने मल्टीमिडिया चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातुन लोकांना आरोग्याबाबत दक्ष केले आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.
ज्येष्ठ योग गुरु भुतडा यांनी मल्टीमिडिया प्रदर्शन हे सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त असून नेमकपणे माहिती देणारे दालन आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा. असेही आवाहन त्यांनी केले.चव्हाण म्हणाले,सामान्य लोकांना योगाबद्दल माहिती व्हावी यासाठी मल्टीमिडियाच्या माध्यमातून प्रदर्शनाचे आयोजन केले. शहरातील शालेय विदयार्थी महाविदयलयीन युवक व ज्येष्ठ नागरिक यांनी प्रदर्शनाला भेट दयावी असे आवाहन केले. हे प्रदर्शन भारतीय प्राचीन योगाची माहिती देणारे आहे. यामध्ये प्रार्थना, पूरक हालचाली मानेच्या, योगासने उभी, बैठक, पाटीवरील, पोटावरील, प्राणायम, ध्यान आदीबाबत माहिती मिळणार आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत सर्वांसाठी खुले राहील. प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असेल. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी केले आहे.