सोलापूर : दि.२३ (प्रतिनिधी) दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव समारोह समिती सोलापूर च्या वतीने येत्या 27 जुलै रोजी सोलापुरात फुले आंबेडकर कार्यकर्त्यांचा जागर मेळावा आयोजित केला जाणार असल्याची माहिती मेळाव्याचे स्वागत अध्यक्ष व सोलापूर जिल्ह्याचे दलित पॅंथर चे माजी अध्यक्ष अंबादास शिंदे यांनी दिली आहे. नवी पेठ येथे कामगार शक्ती जनरल युनियनच्या कार्यालयात दिनांक 18 जून रविवार रोजी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलत होते.
प्रारंभी मेळाव्याचे संयोजक व ज्येष्ठ प्रबुद्ध साहित्यिक डॉक्टर कीर्तीपाल गायकवाड व मेळाव्याचे कार्याध्यक्ष जनार्दन शिंदे यांनी फुले आंबेडकर कार्यकर्त्याचा मेळावा घेण्याचा उद्देश आपल्या मनोगत आतून व्यक्त केला तर मेळाव्याचे निमंत्रक बाबू बनसोडे यांनी दलित पॅंथरच्या सुवर्ण महोत्सवा निमित्त ग्रंथ प्रकाशित होणार असल्याचे जाहीर केले या जागर मेळाव्यात दलित पॅंथर चे ज्येष्ठ नेते अंबादास शिंदे व जनार्दन शिंदे यांचा अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचे संयोजक डॉक्टर कीर्ती पण गायकवाड यांनी जाहीर केले.
या पॅंथर सुवर्ण महोत्सव मेळाव्याचे निमित्ताने सोलापुरातील साहित्यिक पत्रकार कलावंत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी केला. यावेळी अनेकांची मार्गदर्शनपर भाषणे झाली यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष फारुख शेख प्रबुद्ध साहित्य धम्म परिषदेचे अध्यक्ष कल्याण श्रावस्ती युवा पत्रकार व दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद मानवाधिकार संघटनेचे नेते कुमार लोंढे,भैया बाबर,गोपाळ घाडगे,नेते राहुल गायकवाड, कुमार चन्ना,कामगार नेते राजेभाऊ सोनकांबळे, माजी डीवायएसपी बाळासाहेब सरोदे,सिद्धार्थ कदम,सुनील आबुटे,चौधरी व्हि.बी.,बाळासाहेब काटे,राजेश सुरवसे,भीम सम्राट चॅनलचे विश्वास गायकवाड आदी मान्यवर या नियोजन बैठकीस उपस्थित होते.
यानंतर दुसरी बैठक येथे रविवारी डाग बंगला सोलापूर येथे घेण्याची ठरले तरी या होणाऱ्या बैठकीस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक बाबू बनसोडे संयोजक डॉक्टर कीर्तीपाल गायकवाड कार्याध्यक्ष जनार्दन शिंदे व स्वागताध्यक्ष अंबादास शिंदे यांनी केले आहे.