जखमी म्हणतात आम्ही मजूर;नगरसेवक म्हणतात चोरी करायला आले
सोलापूर : दि.१५ (प्रतिनिधी) एमआयएम माझी नगरसेवक व त्याच्या मुलाचं एका व्यक्तीस मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे.याबाबत मजुरांकडून अधिक माहिती जाणून घेतली असता,एमआयएम माझी नगरसेवक रियाज खरादी यांच्या घरचे वायरिंगचे कामकाज सुरू होते.कामकाज करताना भिंतीमधून माती निघाली असता त्याचा जाब विचारत एमआयएम माझी नगरसेवक आणि त्याच्या मुलाने मारहाण केली .यामध्ये दोघांना मारहाण करतानाच व्हिडीओ वायरल झाला आहे.सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करून जेलरोड पोलीस ठाणे येथे फिर्याद दिल्याची माहिती आदिल मोहम्मद इसाक शेख(वय 23,तेलंगी पाछा पेठ सोलापूर),अरफात जाफर बांगी(वय 18,रा,बसवेश्वर नगर,नई जिंदगी,सोलापूर) यांनी दिली.याबाबत एमआयएम नगरसेवक रियाज खरादी यांकडून अधिक माहिती घेतली असता,ते दोघे चोरी करण्याच्या उद्देशाने माझ्या बांधकामाच्या जागेवर आले होते.त्यांची विचारपूस केली असता ,त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यावेळी ही झटापट झाली.
माती बाहेर कशी आली याचा जाब विचारत केली मारहाण- अरफात बांगी व आदिल शेख हे माहिती देताना सांगितले की,एमआयएम नगरसेवक माझी रियाज खरादी यांचे घरी वायरिंगचे काम करत होते.गेल्या तीन दिवसांपासून एमआयएम नगरसेवक रियाज खरादी यांच्या बांधकाम ठिकाणी कामकाज सुरू होते. बुधवारी 13 सप्टेंबर रोजी कामकाज करत असताना ,मागील बाजूस भिंतीमधून थोडी माती बाहेर आली.यावरून माझी नगरसेवक रियाज खरादी यांनी आम्हाला जाब विचारला आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.अरफात बांगी याने दिलेल्या माहितीनुसार शिवीगाळ करू नका,भिंत आम्ही पाडली नाही असे सांगितले,पण काही वेळाने एमआयएम माझी नगरसेवक रियाज खरादी व त्यांच्या मुलाने मारहाण करण्यास सुरुवात केली.ही भांडण सोडविण्यासाठी आलेल्या आदिल शेख या मजुराने प्रयत्न केला असता त्याला देखील जबर मारहाण करण्यात आली.याबाबत व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.
एमआयएम माझी नगरसेवकाने सर्व आरोप फेटाळून लावला चोरीचा आरोप- मारहाण किंवा झटापट होतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होताच ,एमआयएम माझी नगरसेवक रियाज खरादी यांनी माध्यमांना खुलासा देताना सांगितले की, बुधवार 13 सप्टेंबर हा कामगारांचा साप्ताहिक सुट्टीचा दिवस असतो.माझ्या बांधकाम साईटवर कोणत्याही प्रकारचे कामकाज सुरू नव्हते.ते दोघे जण माझ्या कडे कामास नव्हते.उलट माझ्या बांधकामधील साहित्यांची चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते.त्यांना हटकले असता त्यांनी वादविवाद करण्यास सुरुवात केली.त्यावेळी माझा मुलगा अरबाज खरादी यासोबत देखीक वादावादी केली. त्यावेळी ही झटापट झाली.याबाबत आम्ही देखील पोलीस स्टेशनला चोरीची फिर्याद देणार आहे ,असे माझी नगरसेवक रियाज खरादी यांनी सांगितले.