Ticker

6/recent/ticker-posts

रामहरी (दादा) जाधव यांचा अमृत महोत्सवी सोहळा सर्व समाजाला दिशादर्शक : शिवश्री नेताजी गोरे

सोलापूर : दि.०४ (प्रतिनिधी) प्रत्येकाच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या आई- वडिलांचं परिश्रम दडलेले असते. ग्रामीण मातीशी नाळ असणारा शेतकरी आपल्या लेकरांना शिक्षण मिळावं, त्यांनी त्यांच्या भावी जीवनात सुखाचे दिवस पहावेत म्हणून अष्टोप्रहर काबाडकष्ट करीत असतात. तसंच कष्ट झेलत रामहरी दादांनी त्यांची भावी पिढी घडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या कष्टातून उभारलेला परिवार दादांचा अमृत महोत्सव सोहळा साजरा करतो आहे. हा सोहळा सर्व समाजाला दिशादर्शक असल्याची भावना मराठा सेवा संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष शिवश्री नेताजी गोरे यांनी व्यक्त केली.

सोलापुरातील शेळगी परिसर - जय लक्ष्मी सोसायटीत गुरूवारी, ०१ सप्टेंबर रोजी सायंकाळी शिवश्री प्रा. संजय जाधव यांच्या निवासस्थानी त्यांचे वडील रामहरी (दादा) बलभीम जाधव यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त तसेच मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त अमृत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास महाराष्ट्र राज्य बिल्डर्स असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री दत्ता (मामा) मुळे आणि मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रशांत पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मातोश्री विमल रामहरी (दादा) जाधव - यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या हस्ते  प्रतिमा पूजन झाले. यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगे येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व आजपर्यंत शेतकरी म्हणून आयुष्य जगलेल्या रामहरी (दादा) जाधव यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांची धान्य व ग्रंथ तुला झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष शिवश्री नेताजी गोरे होते.



यावेळी बोलताना,शिवश्री गोरे यांनी मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देताना मराठा सेवा संघाच्या सामाजिक योगदानावर थोडक्यात प्रकाशझोत टाकला. यावेळी त्यांनी रामहरी दादांना शुभेच्छा देताना, आई-वडिलांच्या अपार कष्ट अन् मेहनतीवर उभ्या राहिलेल्या पिढ्यांना मार्गदर्शक सोहळा असून, हा सोहळा प्राध्यापक संजय जाधव आणि त्यांचा परिवार मोठ्या जल्लोषमय वातावरणात साजरा करतोय हे दिशादर्शक असून वृद्धापकाळात आई-वडिलांची सेवा करणे प्रत्येकाचं कर्तव्य असल्याची जाणिव निर्माण करून दिली.

यावेळी बिल्डर्स असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री दत्ता (मामा) मुळे - आणि मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रशांत पाटील यांच्यासह अन्य उपस्थित मान्यवरांनी रामहरी (दादा) जाधव यांना अभिष्टचिंतन केले. यावेळी ग्रंथतुलेसाठी संकलित ग्रंथ व पुस्तके प्रा. संजय जाधव यांच्या परिवाराकडून दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि तुळजापूर तालुक्यातील काही गावांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी सस्नेह भेट दिली.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जाधव यांच्या सुकन्या कु. साधना जाधव यांनी केले तर शिवश्री प्रा.परमेश्वर हाटकर यांनी उपस्थितां आभार मानले. 

यावेळी अरविंद मोहीते,विकास नारायणकर, प्रा जिवन यादव, पत्रकार संजय पवार, प्रा.मारुती मस्के,प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी, प्रा.डॉ. युवराज सुरवसे,प्रा.डॉ. संतोष बताले, माजी सरपंच शंकरराव यादव, शहापुरचे सरपंच पाडुरंग सुरवसे, उपसरपंच नाना पाटील,  पोलिस पाटील बाबाजी खरात, विविध प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक-शिक्षक, आप्तेष्ठ आणि मित्र परिवार उपस्थित होते.