Ticker

6/recent/ticker-posts

भारतरत्न राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

सद्भावना दिनानिमित्त जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली शपथ
             
सोलापूर : दि.१९ (प्रतिनिधी)  भारताचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

         
यावेळी 'सद्भावना' दिनानिमित्त शंभरकर यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना शपथ देण्यात आली.

          

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार अमरदीप वाकडे, सुप्रिया ढोले, सहायक पुरवठा अधिकारी साळुंखे,नायब तहसीलदार लटके, पुदाले, बनसोडे,कामगार नेते अशोक जानराव यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, महापालिकेतील कामगार उपस्थित होते.