Ticker

6/recent/ticker-posts

... 'इको फ्रेंडली' गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

सोलापूर : दि.२२ (प्रतिनिधी) कलावृंदावन चित्रशाळा आणि इको फ्रेंडली क्लब यांच्यावतीने पोलिसांच्या मुलांसाठी इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

पोलीस उपायुक्त डॉ.दिपाली धाटे - यांच्या प्रोत्साहनातून पोलीस वेल्फेअर यांच्या सहकार्याने हा उपक्रम पोलीस मुख्यालय या ठिकाणी राबविण्यात आला. मूर्तिकार आशिष माशाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मातीपासून गणपती कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक दाखवले. सर्व मुला-मुलींनी उत्साहाने मातीचे गणपती बनवले. 

स्वागत आणि प्रास्ताविक इको फ्रेंडली क्लबचे - संस्थापक परशुराम कोकणे यांनी केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस वेल्फेअर विभागाचे पोलीस निरीक्षक शिवशंकर बोंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अमोल कानडे, बाबू मंगरूळे, प्रकाश कोरे, कलावृंदावन चित्र शाळेचे अभिषेक माशाळे, शुभम गुळसकर यांनी सहकार्य केले.



कार्यशाळेत बनवलेले मातीचे गणपती विद्यार्थ्यांनी घरी नेले. यंदाच्या वर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प यावेळी विद्यार्थ्यांनी केला.