सोलापूर : दि.०९ (प्रतिनिधी) सोलापूर शहरातील नागरी सुविधांच्या अभावामुळे चिंब पावसात पालिका आयुक्तांचा निषेध करून आंदोलन करण्यात आला .शहरात पावसामुळे विविध ठिकाणी ड्रेजेने ,नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.घोंगडे वस्ती, भवानी पेठ या गावठाण भागात व जुनी जोडभावी पेठ पोलीस चौकीच्या पाठीमागील वसाहतीत नागरी सुविधांच्या अभावामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.वारंवार प्रशासनाला या संदर्भात विनंती करुन,निवेदने देऊन सुद्धा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही.यापूर्वी अनेक नागरिकांनी आंदोलनाचा इशारा देऊन देखील प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.त्यामुळे ९ ऑगस्ट पासून भर पावसात धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.जोपर्यंत प्रशासन येथील नागरी सुविधां संबंधी दखल घेत नाही,तोपर्यंत सदर आंदोलन चालू राहणार असल्याचे येथील जागरुक नागरिक कल्याण करजगी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
चिंब पावसात नागरिकांचे रस्त्यावर आंदोलन- दोन दिवसांपासून सोलापूर शहरात चिंब पाऊस सुरू झाले आहे.सूर्याचे दर्शन देखील झाले नाही.पावसामुळे ड्रेनेज ,नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने नगरसेवक देखील हात उचलत आहेत.सोलापूर पालिका प्रशासन देखील नागरिकांना मुबलक सुविधा देत नाही. शहरात नागरिकांनी जीवन जगणे असह्य झाले आहे.आरोग्य धोक्यात आले आहे,डेंग्यू,मलेरिया,कॉलरा यासारख्या संसर्गजन्य आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे.य सर्व बाबींना वैतागून नागरिकांनी चिंब पावसात आंदोलन केले
यावेळी आंदोलनात नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते- या आंदोलनात आप्पा गवळी,गुरुनाथ कोळी,राहुल गुंडला,पुरीषोत्तम मामड्याल,रमेश सिरसिल्ला,श्रीकांत नलगेशी,गौरीशंकर अडगळे,राहुल गंगीशेट्टी,गणेश कोळी,रजनी सिरसिल्ला,अमृता साठे,नरसव्वा उत्कम,भवानी युवा क्रिडा मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येंने उपस्थित होते.नागरिकांच्या समस्या सोडविल्या गेल्या नाही तर मोठे जनआंदोलन करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
