सोलापूर : दि.२१ (प्रतिनिधी) सैनिकी मुलांचे वसतीगृह पंढरपूर येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात वसतीगृह अधीक्षक या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्जदार हे सैन्यातून सुभेदार या पदावरुन सेवानिवृत्त झालेले असावेत. इच्छुकांनी आपला अर्ज, आधारकार्ड, मोबाईल नंबर व ओळखपत्रासह 26 ऑगस्ट 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे सादर करावेत.
