Ticker

6/recent/ticker-posts

इतिहासाचे जतन करून नव्या पिढीकडे सुपूर्द करा : निज़ामोद्दीन शेख


सोलापूर : दि.१७ (प्रतिनिधी) स्वातंत्र्याच्या इतिहासाचे जतन करणे व नवीन पिढीला खरा इतिहास सांगणे, व त्याच्याकडे सुर्पद करणे आज काळची गरज बनली आहे. ही महत्वाची जबाबदारी आम्ही सर्वानी स्वीकारली पाहिजे. आम्हां सर्वाना माहित आहे कि आज खऱ्या इतिहासात रद्दोबदल करण्याचा काम पध्दतशीरपणे चालू आहे, हे विसरता कामा नये म्हणून आपण आपल्या इतिहासाबदल जागरूक राहिजे 

भारताच्या स्वातंत्र्यात मुस्लीमांचा योगदान सुर्वण अक्षरात लिहिण्यासारखा आहे कारण या लढाईत पुरुषांबरोबर महिलांचा ही मोठा योगदान होता, मुस्लीमांची बलिदानाची गाथा कडे दुर्देवाने आम्हीच  दुर्लक्ष केले आहे,याची खंत वाटते.गुलीस्तां को जब भी लहू की जरूरत पडी। तो सबसे पहले हमारी ही गरदन कटी ॥ असे असताना आज आम्हांला वाईट नजरेने पाहिले जाते याचे वाईट वाटते
 

असे मत इतिहास तज्ञ व मिल्ली कौन्सील दिल्लीचे सह-सचिव निजामोद्दीन शेख यांनी  स्वातंत्र्य चा अमृत महोत्सव निमित्त  विरसा फौंडेशन आयोजित "स्वातंत्र्याच्या लढाईत मुस्लीमांचा योगदान " हया कार्यक्रमात व्यक्त केले. ते पुढे म्हणाले - रोड,स्टेशन,शहराचे नांवे बदलले तर इतिहास बदलत नांही याची दखल कोण घेणार ? या मुळे भारतीयांमध्ये मतभेद वाढत आहे.
  

अॅड. यू एन बेरीया यांच्या अध्यक्षस्थेखाली झालेल्या कार्यक्रमात सचिव अशफाक जैद यांनी प्रास्तविक केले इक्बाल सय्यद यांनी पाहुण्याचा परिचय व सत्कार केले या वेळी  उपाध्यक्ष डॉ इ. जा. तांबोळी , सहसचिव मजहर अल्लोळी खजीनदार समद फुलमामडी, माजी सचिव अय्यूब नल्लामंदू . जाफर बांगी , वसीम शाबाद , यांची प्रमुख उपस्थिति होती. या वेळी विरसा फौंडेशनचे माजी सचिव अय्यूब नल्लामंदू यांना "जीवन गौरव " पुरस्कार मिळाल्या बदल अॅङ बेरीया यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

या नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड  बेरीया यांनी मार्गदर्शन करत इतिहासाचा आढावा घेतला. 
सुत्र संचलन सचिव अशफाक सातखेड यांनी केले तर आभार जाफर बांगी यांनी मानले. यावेळी शफी कॅप्टन , विकार शेख ,म.हुसेन बक्षी,हाजी शमीम चांदा,सफदर सयद ,आदि उपस्थित होते.