स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळ्या निमित्याने विविध घोषवाक्याच्या गजरात रिमझिमत्या पावसात शिवभूमी विद्यालय प्राथमिक विभागाची प्रभात फेरी काढण्यात आली. तीन रंगी फुगे तोरणे पताक्यांनी शाळा सुशोभित केली .भारतमाता, राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ध्वज स्तंभाचे पूजन करून राष्ट्रध्वज फडकवला. याप्रसंगी तिन्ही विभागाचे शाळेचे मुख्याध्यापक सौ पाटील आश्विनी ,अंजू नरसाळे ,श्रीम कवटे तसेच माजी मुख्या शिंगाडे सर , माजी विद्यार्थी श्री नगरे व शाळा व्यवस्थापन सदस्य व उत्साही पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.घरोघरी असणाऱ्या तिरंग्याची काळजी घेण्याचे प्रत्यक्ष कृती दाखवून आवाहन करण्यात आले . विद्यार्थ्यांची भाषणे ,गीत गायन घेण्यात आले .
अमृत महोत्सवी कार्यक्रमा अंतर्गत शाळेमध्ये दि १३ ,१४ व १५ आँगस्ट दरम्यान विविध खेळ व चित्रकला नृत्य ,वक्तृत्व ,रंगभरण, रांगोळी, हस्ताक्षर ,वेशभुषा अशा स्पर्धांचे आयोजन सांस्कृतिक प्रमुख श्रीम कोठेकर योगिता यांनी केले.तसेच घरोघरी तिरंगा झेंडा लावून व रोशनाई करून अमृत महोत्सव अतिशय आनंदाने साजरा करण्यात सांगितले .कार्यक्रमात निशाण कवायत देशभक्ती नृत्य सादर केले गेले . तसेच भारतातील विविध राज्यातील वेशभुषेतील विद्यार्थी कार्यक्रमाचे आकर्षण ठरले .
कराटे मध्ये गोल्ड ब्रांझ सिल्वहर पदक मिळवलेल्या , MTS मध्ये राज्यात आलेल्या तसेच ऑनलाईन बाह्य स्पर्धेत बक्षिस पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून बक्षिस वाटप करण्यात आले सर्वांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात हर घर तिरंगा लावून आनंदाचा उत्सव साजरा केला.
