समर्पित जीवन
सोलापूर : दि.०४ (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराप्रमाणे बौध्द धम्म प्रसार व प्रचाराचे काम महाराष्ट्रभर कर्नाटक राज्यात करुन बौध्द समाज निर्मित करण्याचे मोलाचे कार्य मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे यांनी केले. त्यांचे जीवन एक समर्पित जीवन आदर्श जीवन होते. ते समाज बदल घडविणारे आहे, असे विचार सुप्रसिध्द साहित्यीक व माजी शिक्षणाधिकारी योगिराज वाघमारे यांनी मांडले.
बुधवारी, ०३ ऑगस्ट रोजी सायंकाळी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे मातोश्री शारदाताईंचा जन्मोत्सव व कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार साहित्यीक तथा अभिनेते डॉ. किर्तीपाल गायकवाड यांनी केले.
मातोश्री शारदाताई शिंदे या शिक्षिका होत्या. त्या मी राहात असलेल्या संजय नगर जवळच सम्राट अशोक सोसायटीमध्ये राहात होत्या. त्यांनी आपले कुटूंब आदर्श करुन समाजामध्ये बदल घडविण्यासाठी स्वत:च्या मुलामुलींचे आंतरजातीय विवाह करुन जातीअंताचे महत्वाचे काम आयुष्यभर केले. त्यांनी नोकरी करताना दिलेले योगदान अविस्मरणीय आहे, असेही प्रमुख पाहुणे सुप्रसिध्द साहित्यीक योगिराज वाघमारे यांनी म्हटले.
या सोहळ्यास औरंगाबादचे भंते संघपाल, माजी पोलिस उपायुक्त आबासाहेब दैठणकर, संस्थेचे खजिनदार शिरीष सितासावद, डॉ. प्रा. विजया महाजन, कुमारी स्वर्णिमा राजे राजीव शिंदे, सौ. प्रा. विजयालक्ष्मी राजीव शिंदे, संस्थेचे सहसचिव सचिन राजेंद्र दिलपाक, प्रा. एम. बी. शिंदे, ॲड. अविनाश काले, विचारवंत अशोक जेठीथोर, लातूरचे सुनिल मांदळे, कुर्डुवाडीचे भाऊसाहेब कांबळे, बार्शीचे सत्यजीत जानराव यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रास्ताविक करतांना मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे मेमोरीयल ट्रस्टचे उपाध्यक्ष राजेंद्र निकाळजे (परांडा) यांनी आपल्या प्रास्ताविकात, मातोश्री शारदाताई यांचे जीवन आणि कार्य आपल्या सर्वांसाठी कसे मार्गदर्शक आहे, हे सांगून त्यांनी मी स्वत: त्यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे घडलो आहे व त्यांचे मार्गदर्शनाखाली परांड्याचे बौध्द विहार महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाने उभा राहात आहे, असा कृतज्ञता भाव व्यक्त करून त्यांनी मातोश्री शारदाताईंचा जीवनपट मोजक्या शब्दात मांडला.
भंते संघपाल (औरंगाबाद) यांनी, बौध्द धम्म गाथा पुस्तिकेचे प्रकाशन करुन आपल्या प्रवचनामध्ये बौध्द समाज निर्मितीसाठी अष्टशिल प्रत्येकाने पाळणे महत्वाचे आहे, हे समजावून सांगितले.
मातोश्री शारदाताई शिंदे यांचे बंधू आयु. अशोक दिलपाक यांनी कुंभारी या जन्मगावी मी आणि मातोश्री शारदाताई शिंदे यांनी खुप मदत केली. व पुर्ण गावाचे परिवर्तन घडवून आणले, याची सविस्तर माहिती सांगितली.
यावेळी संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. अंबादास शिंदे यांनी आदर्श पत्नी म्हणून मातोश्री शारदाताई शिंदे यांनी आदर्श समाज आदर्श शिक्षण घेण्याचा कसा प्रयत्न केला, या कामामध्ये आम्ही दोघांनी मिळुन तन-मन-धन-ने व समर्पित भावनेने काम केल्याचे सांगून समाजाने मातोश्री शारदाताई शिंदे या पत्नीकडून जे मी शिकलो ते समाजाने घेण्याची गरज आहे, असे सांगितले.
यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त संतोष गायकवाड (पोलीस आयुक्तालय, सोलापूर) यांनीही मातोश्री शारदाताई शिंदे यांच्याबद्दल विचार मांडले. यावेळी माजी पोलिस अधिक्षक आबासाहेब दैठणकर यांनी दलित पँथरसारख्या संघटनेची आज गरज आहे, असे सांगितले.
त्यांचा पुष्पहार, शाल, सन्मानपत्र, बौध्द धम्म गाथा पुस्तिका देऊन सुमारे ५० सन्मानीय कार्यकर्त्यांचा सत्कार डॉ प्रा. एम. डी. शिंदे व विठ्ठल दत्तु वडणे, सौ. ललिता सोमनाथ डावखरे, संकेत गोपाळ दिलपाक, सचिन राजेंद्र दिलपाक, कमलाकर वडणे, हे सर्व कुंभारी येथील रहिवाशी असून त्यांचा सन्मान संस्थेचे अध्यक्ष आयु.अंबादास शिंदे व प्रा. डॉ. विजया महाजन यांनी मिळून केला.
यावेळी या सुंदर गाथा पुस्तिका निर्मितीचे काम आयु. कुणाल दिलपाक यांनी केल्याचे सर्वांना जाहिर करण्यात आले. यावेळी पाहुण्यांचा सत्कार डॉ. प्रा. विजया महाजन यांनी केला व कार्यक्रमाचे समारोप आयु. राजीव शिंदे यांनी केला.
