दिल्ली : दि.२१ (प्रतिनिधी) भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पुन्हा एकदा 20 यूट्यूब चॅनेल, 2 ट्विटर अकाऊंट, 2 इंस्टाग्राम अकाउंट, 2 वेबसाइट आणि एका फेसबुक अकाउंटला ब्लॉक करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. मंत्रालयाचे सहसचिव विक्रम सहाय यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या चॅनेलचे 12 दशलक्ष सबस्क्राईबर आहेत. या सर्व माध्यमांतून भारतविरोधी प्रचार केला जात होता. विक्रम सहाय यांनी सांगितले की, हे सर्व चॅनेल (YouTube) आणि खाती पाकिस्तानमधून चालवली जातात आणि भारतविरोधी बातम्या आणि देशविघातक माहितीचा प्रसार केला जातो.
दरम्यान,याआधी गेल्या वर्षी - डिसेंबरमध्येही भारतविरोधी प्रचार करणाऱ्या 20 यूट्यूब चॅनेल आणि दोन वेबसाइट्सवर बंदी घालण्यात आली होती. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले होते की,आम्ही भारतविरोधी प्रचार आणि फेक न्यूज पसरवणाऱ्या वेबसाइट्सवर कारवाई केली आहे. यूट्यूब चॅनल आणि वेबसाइट पाकिस्तानमधून चालवल्या जाणार्या प्रोपागंडा नेटवर्कशी संबंधित आहेत. तसेच भारताशी संबंधित विविध संवेदनशील विषयांबद्दल खोट्या बातम्या पसरवत होते. माहिती युद्धाचा हा नवा मार्ग असून सरकार त्याबाबत कठोर झाले आहे.
याप्रकरणी सविस्तर माहिती देताना- संयुक्त सचिव विक्रम सहाय म्हणाले की, ''या अकाऊंट्स आणि चॅनेल्सच्या माध्यमातून भारतविरोधी अजेंडाचा प्रचार केला जात होता. भारतीय लष्कर,पंतप्रधान,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, सीडीएस अजित डोवाल,लष्करप्रमुख एमएम नरवणे यांना निशाणा केला जात होता.'' परिणामी फेक न्यूजच्या माध्यमातून बनावट माहितीचा प्रसार केला जात होता. गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळताच कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले,देशविरोधी सामग्रीचा प्रसार रोखण्याचा मंत्रालयाचा प्रयत्न आहे. पाकिस्तान-आधारित यूट्यूब चॅनेल 'खबर विथ फॅक्ट' ज्याचे 8,93,148 दर्शक आहेत. भारतविरोधी आणि प्रक्षोभक आणि खोट्या बातम्या चालवल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याचवेळी 4,92,967 दर्शक असलेल्या 'खबर तेज' चॅनलवर कारवाई करण्यात आली आहे. यानंतर 'ग्लोबल ट्रुथ' या वाहिनीसह इतर अनेक आहेत.
इतर YouTube चॅनेलमध्ये 'न्यू ग्लोबल फॅक्ट' चॅनल, 'इन्फॉर्मेशन हब', 'फ्लॅश हब', 'फैसल तरार स्पीच', 'अपनी दुनिया टीव्ही', 'हकीकत की दुनिया', 'शहजाद अब्बास', 'मेरा पाकिस्तान विथ साहब' यांचा समावेश आहे. , 'खबर विथ अहमद', 'एचआर टीव्ही', 'सबी काझमी', 'सच टीव्ही नेटवर्क', 'साकिब स्पीकर्स', 'सलमान हैदर ऑफिशियल', 'साजिदगोंडल स्पीच्स', 'मलीहा हाश्मी', 'उम्रादराज गोंडल', 'खोज टीव्ही', 'खोज टीव्ही- 2.0', 'कव्हर पॉइंट', 'जुनेद फिल्म्स', 'नॅशनल स्टुडिओ', 'इन्फॉर्मेटिव्ह वर्ल्ड' हे इतर आहेत.
शिवाय, मंत्रालयाने अशाप्रकारची - माहितीही सार्वजनिक केली आहे. याआधी बुधवारी माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी सांगितले होते की, भारतविरोधी माहिती प्रसारित करणाऱ्या वेबसाइट्स आणि यूट्यूब चॅनेलवर कारवाई केली जाईल. ते पुढे म्हणाले होते की,अशी वीस खाती सापडली आहेत, जी भारतविरोधी प्रोपागंडा करत होती.
