सोलापूर : कामगार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध कामगार संघटनांच्या कामगार संघटना महासंघाच्या सोलापूर जिल्हा महासचिव पदी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे सी.ए.बिराजदार यांची निवड महासंघाच्या झालेल्या बैठकीत एकमताने करण्यात आली.
सिध्देश्वर पेठ येथील युनियन कार्यालयात विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. याबैठकीत सी. ए.बिराजदार यांची निवड करण्यात आल्याचे जाहिर करण्यात आले. यापूर्वी त्यांनी पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या चळवळीत कार्य केले आहे. तसेच स्वतंत्र विद्यापीठ संघर्ष समितीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात स्वतंत्र विद्यापीठ व्हावे याकरिता सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा व आंदोलने केली आहेत.
सामाजिक,पत्रकारिता आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा असंघटीत कामगार,महिला आणि बांधकाम क्षेत्रातील कामगारांना होईल असा विश्वास कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी साथी बशीर अहमद शेख,सिध्दार्थ बोराडे,छगन पंढरे, सायबण्णा तेगेळ्ळी,महेश गायकवाड,एजाज शेख,श्रीमती लक्ष्मी देवकर,शिवाजी कांबळे,अशपाक शेख,मिलिंद गायकवाड,शरणू जहीर शेख उपस्थित होते.तर सर्वच क्षेत्रातून बिराजदार यांचे अभिनंदन होत आहे.
