MPSC संयुक्त गट-क पूर्व परीक्षा 2026: उमेदवारांना मोठा दिलासा! अर्ज भरण्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढली
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने संयुक्त गट-क पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. आज (6 ऑगस्ट) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असतानाच आयोगाने ऑनलाईन अर्ज सादर करण्यास 10 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तांत्रिक अडचणी आणि उमेदवारांच्या मागणीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
या भरती प्रक्रियेत तलाठी,लिपिक-टंकलेखक,कर सहाय्यक तसेच इतर गट-क पदांचा समावेश असून,राज्यभरातील हजारो उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी आहे. अद्याप अर्ज न भरलेल्या पात्र उमेदवारांनी मुदतवाढीचा लाभ घेत अंतिम तारखेपूर्वी अर्ज पूर्ण करावा.
महत्त्वाची माहिती - परीक्षा: MPSC संयुक्त गट-क पूर्व परीक्षा 2026.
पदे: तलाठी,लिपिक-टंकलेखक,कर सहाय्यक व इतर गट-क पदे.
अर्जाची नवीन अंतिम तारीख: 10 ऑगस्ट 2026
अर्ज पद्धत: ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांसह अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
