टिपू स्वातंत्र्य सेनानीचा इतिहास सांगितला जातो;दुसरी बाजू देखील समोर आणायला पाहिजे
आम्ही निवेदन देऊन आणि पुढील कारवाईसाठी भाग पाडू
सोलापूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची छत्रपती शिवरायांशी तुलना केल्याने राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हिंदुत्ववादी संघटना जबरदस्त आक्रमक झाल्या आहेत.सोलापुरात भाजपच्या वतीने काँग्रेस भवन समोर येऊन हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केले.भाजप शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि माजी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन झाले. भाजप शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी हर्षवर्धन सपकाळ यांचा तीव्र शब्दांत निषेध केला. टिपू सुलतान यांची तुलना महाराष्ट्रचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत केल्याने महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी ताबडतोब माफी मागावी अशी मागणी भाजप शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी केली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीत टिपू सुलतान यांचा फोटो आहे तर आम्ही केंद्रात निवेदन देऊ पुढील कारवाईची मागणी करू अशीही प्रतिक्रिया रोहिणी तडवळ
टिपू सुलतान यांचा दुसरा इतिहास समोर यायला पाहिजे - भाजपचे माजी शहर अध्यक्ष व विद्यमान गटनेता नरेंद्र काळे यांनी इतिहासकारांना ओपन चॅलेंज दिले आहे. इतिहास कार म्हणतात टिपू सुलतान स्वतंत्र सेनानी होता.तर त्याच इतिहासकारानी टिपू सुलतान याची दुसरी बाजू समोर आणावी. टिपू सुलतान याने हजारो महिलांच्या अब्रू लुटल्या होत्या,हजारो हिंदूची कत्तल केली. टिपू सुलतानची ही बाजू समोर यायला पाहिजे. अशी प्रतिक्रिया भाजप माजी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिली आहे. ऐन शिवजयंतीच्या समोर हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्याने महाराष्ट्र राज्यातील जनता आक्रमक झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा तीव्र शब्दांत निषेध करत,सपकाळ यांची प्रतिमा फाडून,जोडे मारले आणि पायदळी तुडवले. विशेष म्हणजे हे आंदोलन काँग्रेस भवन समोर करण्यात आले.
मोठ्या पोलीस बंदोबस्तात भाजपचे आंदोलन - भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोलापूर मधील काँग्रेस भवन समोर अचानकपणे आंदोलन केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. अचानकपणे झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती. पोलिसां समोर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिमा फाडण्यात आली,जोडे मारण्यात आले,तसेच एक मडके आणून काँग्रेस भवन समोर फोडले.
