सोलापूर : कोंडी,जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ कोंडी संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलामध्ये विद्यार्थ्यांमध्ये उद्योग व्यवसायाचे कौशल्य निर्माण व्हावे हा विधायक दृष्टिकोन ठेवून आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले.
या आनंद बाजाराचे उद्घाटन कोंडी गावच्या सरपंच सुहासिनी निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी पालक समितीचे अध्यक्ष अर्चना गुंड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सरपंच सुहासिनी निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान निर्माण व्हावे यासाठी आयोजित केलेल्या आनंद बाजाराचे स्वागत करून सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
या फूड फेस्टिवल म्हणजेच आनंद आनंद बाजारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सुगंधी दूध विक्री झाली. विद्यार्थ्यांनी प्रचंड मोठा प्रतिसाद देत जवळपास ७० स्टॉल उभा केले होते. दोन ते तीन तासाच्या बाजारामध्ये जवळपास एक लाख तीस हजार २२० रुपयाची उलाढाल या बाजारामध्ये झाली. थंडगार लस्सी विक्री करून गुरुराज भोसले या विद्यार्थ्याने दर्जेदार आणि विक्रमी विक्री करून प्रथम क्रमांक प्राप्त केला .
यामध्ये वडापाव, चटकदार भेळ,बटाटा कांदा भजी,भेळपुरी, पाणीपुरी, सँडविच,मसाला पापड,सुगंधी दूध,शेंगा लाडू, ज्यूस,उसाचा रस,लांबोटी चिवडा,चायनीज,ढोकळा,इडली सांबर,आईस्क्रीम आधी पदार्थांची खवययांनी मोठी मागणी केली.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ म्हणाले, " स्वाद आणि संस्कृतीचा उत्सव म्हणून आपण दरवर्षी हा कार्यक्रम संकुलामध्ये घेत असतो या उपक्रमामुळे उद्योजकीय कौशल्य,स्वावलंबन,आणि सद्भावना या गुणांची वाढ विद्यार्थ्यांमध्ये होते.
आनंद बाजार केवळ मजा नसून यातूनच विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान आणि उद्योग ज्ञान आणि भान निर्माण होते. यावेळी त्यांनी खडतर प्रवास करून उद्योगांमध्ये प्रचंड मोठ भरारी घेणाऱ्या धीरूभाई अंबानी चे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पालक आणि शिक्षकांनी या उपक्रमामध्ये उत्साहाने सक्रिय सहभाग घेतला. जिजाऊ ज्ञान मंदिर मधील पाचवीच्या विद्यार्थ्यांनी प्रचंड मोठी विक्री केली. आनंद बाजार हा दिवस सर्वांसाठी गोड आठवण देऊन गेला.
या कार्यक्रमासाठी विकास जाधव तुकाराम पाटील, आप्पा भोसले, प्राचार्य सुषमा निळ मुख्याध्यापिका अर्चना औरादे आधी सह शिक्षक वृंद उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब नीळ केले. सर्वांचे आभार मुख्याध्यापक वैभव मसलकर यांनी मानले.
