Ticker

6/recent/ticker-posts

अत्म्हात्याला भाग पडणाऱ्या सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याची एमआयएमची मागणी

डॉ.संपदा मुंडेना अत्म्हात्याला भाग पडणाऱ्या सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याची एमआयएमची मागणी 

अहमदनगर : बीड जिल्ह्यात केज तालुक्यातील कोठरबन येथे राहणारी आणि फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेली डॉ. संपदा मुंडे यांनी एका हॉटेल मध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. आत्महत्या पूर्वी तिच्या हातावर सूसाईड नोट लिहिले होते कि परळी येथील पीएसआय गोपाल बदने यांनी चार वेळा बलात्कार केले. तसेच घरमालक प्रशांत बनकर यांनी तिचा मानसिक त्रास दिल्याने तिने आत्महत्या केली. शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महिला सुरक्षित असल्याचे गप्पा करायचे आणि दुसरीकडे एक उच्च शिक्षित महिला त्रासाला कंटाळून आत्महत्या करते. 



वरिष्ठांकडे तक्रार करुनही काही होत नाही - ही फार गंभीर बाब आहे. हे सर्व पाहता असे दिसते की महिला सुरक्षेचे फक्त आणि फक्त गप्पा आहे. ज्या ठिकाणी छळ करणारा पोलीस अधिकारी आहे. त्या ठिकाणी सामान्य जनतेने न्याय कोणा कडे मागावा हा मोठा प्रश्न निर्माण झाले आहे. तरी गुन्हागारांवर गुन्हा दाखल करून अटक करावी तसेच सदर खटला हा जलदगती न्यायालयात चालून डॉ. संपदा मुंडे आणि तिच्या परिवाराला न्याय मिळून द्यावा. त्याच प्रमाणे कायदे इतके कडक करून त्याला अमलात आणावे की कोणीही किती मोठा व्यक्ती असो त्याने असे कृत्य करण्या अगोदर त्याला कायद्याचे धाक वाटावे. 



या बलात्कार करणाऱ्या नराधमाला - फाशी पेक्षा दुसरी शिक्षा कोणतीच असू शकत नाही अशी मागणी एम आय एम (AIMIM) चे डॉ.परवेज अशरफी यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री महाराष्ट्र,गृहमंत्री,अल्पसंख्याक आयोग,महाराष्ट्र यांच्याकडे केली आहे. व या निवेदनाची माहिती नगरच्या जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधीक्षक,एम आय एम चे राष्ट्रीय अध्यक्ष,राज्य अध्यक्ष सर्वांना कळविले आहे.