Ticker

6/recent/ticker-posts

मेधा पाटकर यांचे युवा प्रेरणा शिबिरात संविधान तक्ता प्रकाशन...

संविधान तक्ता हे उपयुक्त माध्यम,मेधा पाटकर यांचे युवा प्रेरणा शिबिरात संविधान तक्ता प्रकाशन कार्यक्रमात प्रतिपादन.

नर्मदा बचाव आंदोलन आणि जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय यांच्या तर्फे बडवानी,मध्यप्रदेश याठिकाणी आयोजित केलेल्या युवा प्रेरणा शिबिरात एसएमएससी फाउंडेशनचे मनीष देशपांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि प्रमोद काळे यांच्या उडान प्रकाशना तर्फे प्रकाशित होत असलेल्या संविधान तक्त्याच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. मनीष देशपांडे आणि कृतार्थ शेवगावकर यांनी हा तक्ता बनवला असून संविधान प्रचारक नेत्राली ठोंबरे आणि निलम पंडित यांनी या तक्त्याचे हिंदीत भाषांतर केले आहे. 

या प्रकाशन सोहळ्यासाठी मेधा पाटकर यांच्या सहित नर्मदा बचाव आंदोलन चे अनेक कार्यकर्ते तसेच जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय चे संजय मंगो उपस्थित होते. संविधानाची उद्देशिका आणि त्यातील अर्थ सर्व नागरिकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत सोप्या भाषेत पोहचावा या उद्देशातून या तक्त्याची निर्मिती करण्यात आली आहे.आजच्या काळात अशा वेगवेगळ्या माध्यमातून संविधानाचा विचार तसेच नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्ये वेगवेगळ्या माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे असे मत मेधा पाटकर यांनी व्यक्त केले. संविधान निर्मिती च्या वेळेस संविधान निर्मात्यांनी घेतलेली मेहनत,संविधान सभेत असलेला महिलांचा सहभाग याविषयी देखील त्यांनी मांडणी केली. 

नर्मदा नदी च्या काठी असलेल्या बडवानी मध्य प्रदेश मध्ये झालेल्या या प्रकाशन कार्यक्रमाला लतिका राजपूत,कमला यादव,महेन्द्र मंडलोई,राजकुमार सिंह, हेमेन्द्र मंडलोई राहुल यादव,महेंद्र मंडलोई,चेतन साळवे,अँड.योगिनी खानोलकर आदि लोक उपस्थित होते.  या तक्त्याचे अजून इंग्रजी तसेच आदिवासी भाषांमध्ये देखील भाषांतर व्हायला हवे असे मत मेधा पाटकर यांनी व्यक्त केले. 
 
नुकत्याच मराठीतील संविधान तक्त्याच्या 10000 प्रति बार्शी नगर पालिकेने बार्शी शहरातील नागरिक आणि घरांमध्ये वितरित केल्या आहेत. हा संविधान तक्ता मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भागांमधे आता उपलब्ध झाल्यामुळे देशभरात जाण्यासाठी आता सज्ज आहे. हा तक्त्या आता इतर भारतीय भाषांमध्ये देखील लवकरच उपलब्ध करून दिला जाणार आहे.