Ticker

6/recent/ticker-posts

लोकशाही दिनात शासकीय कार्यालयाकडे ५४ तक्रार अर्ज

लोकशाही दिनात २६ शासकीय कार्यालयाकडे ५४ तक्रार अर्ज 

सोलापूर : दि.०४ (एमडी२४न्यूज) प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन घेण्यात येतो. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आजच्या लोकशाही दिनात जिल्ह्यातील २६ शासकीय कार्यालयात च्या ५४ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या तक्रारी संबंधित कार्यालयाकडे वर्ग करण्यात येत असून त्या कार्यालयानी तात्काळ या तक्रारींचा निपटारा करावा,असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिले. 




    
यावेळी उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख प्रांताधिकारी सुमित शिंदे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत इशाधीन शेळकंदे, जिल्हा प्रशासनाधिकारी नगरपालिका विना पवार,अन्न व औषध प्रशासनचे साहेबराव देसाई, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.





लोकशाही दिनात संबंधित शासकीय कार्यालयाकडे आलेल्या तक्रारी पुढील प्रमाणे - मुख्य कार्यकारी अधिकारी – ९, पोलीस अधिक्षक– १, पोलीस आयुक्त – २, जिल्हा अधिक्षक, भूमिअभिलेख- १, आस्थापना जिल्हाधिकारी कार्यालय – ४, सिव्हील सर्जन, सोलापूर-१, कामगार आयुक्त-१, सार्वजनिक बांधकाम विभाग-६, गौणखनिज शाखा-२, महसूल शाखा-३, तहसिलदार,बाशी- १, भीमा पाटबंधारे विभाग-१, तहसिलदार,उत्तर सोलापूर-१, कृषी विभाग,सोलापूर-२, जिल्हा मृद जलसंधारण विभाग-१, महावितरण,सोलापूर-२, तहसिलदार,मोहोळ -३, प्रबंधक जिल्हा अग्रणी बँक,सोलापूर-१, वन विभाग-२, जातपडताळणी विभाग-१, भूसंपादन शाखा-१, तहसिलदार, दक्षिण सोलापूर-२,जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय-२, उपविभागीय अधिकारी,पंढरपूर-१, इतर अर्जदार यांना उत्त्तर देणे-२, दुय्यम निबंधक -१ असे एकूण ५४ तक्रारी अर्ज प्राप्त झाले.