Ticker

6/recent/ticker-posts

अण्णा हजारे ग्रामीण विद्यार्थ्याने सायकल बँकेचे केले कौतुक



अहमदनगर : ऐतिहासिक वारसा लाभलेले यादव कालातील भिनार नंतर अहमदनगर व आता चे अहिल्यानगर शहरास काही कामानिमित्त भेट देण्याचा योग आला.  आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये एक आप्तेष्ट ऍडमिट असल्याने सर्वप्रथम  त्यांची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबाला धीर दिला. डॉक्टरांची भेट घेऊन डॉक्टरांशी संवाद साधत पेशंटची योग्य ती काळजी घेण्याची विनंती केली. त्यानंतर ग्रामीण विद्यार्थ्यांनी सायकल बँकेशी नव्याने जोडल्या गेलेल्या ग्रामीण विद्यार्थिनी सायकल बँक राज्य समादेशक सुप्रिया मंडलिक यांची व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पारनेर तालुक्यातील पलोनी गावामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीत राहणाऱ्या मंडलिक कुटुंबातील तीन भावांशी आणि मॅडमशी संवाद साधला तेव्हा एकविसाव्या शतकातही तीन भावांचे कुटुंब एकत्र गुण्या गोविंदाने व आनंदाने एकाच छता खाली राहते ही बाब विशेष वाटली. मंडलिक कुटुंबाचा पाहुणचार घेतला यावेळी मॅडम नी त्यांनी स्वतः संग्रहित करून प्रकाशित केलेला अण्णा हजारेंचा काव्यसंग्रह मला भेट देऊन माझा यथोचित  सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. 


आम्ही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी त्यांच्या राळेगणसिद्धी गावामध्ये रवाना झालो. अण्णांची भेट घेऊन अण्णा ना ग्रामीण विद्यार्थ्यांनी सायकल बँकेची संकल्पना समजून सांगितली. अण्णांनी ग्रामीण विद्यार्थिनी सायकल बँकेचे व बँकेच्या ब्रीद वाक्याचे (एक हात शेतकऱ्यांच्या लेकीसाठी) विशेष कौतुक केले.





अण्णांनी ग्रामीण विद्यार्थ्याने सायकल बँकेचे कौतुक करत आशीर्वाद दिले व आपल्या मार्फत शेतकऱ्यांच्या मुलींची सेवा अविरत घडो असा आशीर्वाद ही दिला.