सोलापूर विभागातील सी.राहुलने कर्नाटकच्या बेलगावि येथे झालेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत पटकावले अव्वल स्थान
सोलापूर : रेल्वे क्रीडा प्रोत्साहन मंडळाचे (आरएसपीबी) प्रतिनिधित्व करणाऱ्या वाणिज्य विभागातील सी. राहुलने त्याच्या बॉडीबिल्डिंग कारकिर्दीत आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दिनांक १४ ते १६ जानेवारी २०२५ दरम्यान कर्नाटकातील बेलगावि येथे झालेल्या १६ व्या सिनियर बॉडीबिल्डिंग आणि फिजिक स्पोर्ट्स चॅम्पियनशिप-२०२५ मध्ये भाग घेत राहुलने पुरुषांच्या बॉडीबिल्डिंग मधील ८० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
आजवरची सी.राहुलची उत्कृष्ट कामगिरी - सी.राहुल हा भारतीय रेल्वेसाठी एक चमकणारा तारा आहे,त्याने या खेळात सातत्याने आपले समर्पण आणि उत्कृष्टता दाखवली आहे.
त्याच्या अलीकडील काही पुरस्कारांमध्ये हे समाविष्ट आहे:
१) सुवर्ण पदक, मिस्टर वर्ल्ड २०२३
२) सुवर्ण पदक, मिस्टर आशिया २०२३
३) सुवर्णपदक, अखिल भारतीय आंतर-रेल्वे शरीरसौष्ठव अजिंक्यपद २०२४
४) सुवर्णपदक आणि एकूणच चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स, मिस्टर इंडिया २०२५
सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) डॉ.सुजीत मिश्रा यांनी सी.राहुलच्या कामगिरीचे कौतुक केले आणि त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
