बेकायदेशीर प्रतिनियुक्ती अन् बेकायदेशीर नियुक्त्या
सोलापूर : दि.१८ (एमडी२४न्यूज) सोलापूर सिव्हिल सर्जन कार्यालयात पुन्हा एकदा बाजार सुरू झाले आहे. आठवडी बाजार प्रमाणे उलाढाल सुरू आहे. विद्यमान सिव्हिल सर्जन डॉ.सुहास माने यांनी पुन्हा एकदा बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या वितरित करून कामास सुरुवात केली आहे. महत्वाच्या विषयाची कामकाजाची जबाबदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावर सोडली आहे. विद्यमान सिव्हिल सर्जनना कामाचे महत्व किंवा गांभीर्य नसल्याने सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात भोंगळ कारभार सुरू आहे. भोंगळ कारभारात डोम कावळा मस्त कमाई करत आहे. वाहनचालक असलेला डोम कावळा लाखोंची कमाई करत आहे. डोम कावळ्याला डॉक्टर पती-पत्नीचे आशीर्वाद असल्याने त्याची बारीक शिलाई सुरूच आहे.
उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार यांच्या कार्यालयात रीतसर तक्रारी अर्ज दाखल केले आहे. डॉ.राधाकिशन पवार यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. - मेडिकल बिलांचं टेबल,बॉम्बे नर्सिंग ऍक्ट कायद्याची अंमलबजावणी,pcpndt कायद्याची अंमलबजावणी करण्यासारखे महत्वाचे कामकाज सिव्हिल सर्जन यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हातात सोपविले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातुन सोनोग्राफी सेंटरचे प्रमाणपत्र नूतनीकरण करणे किंवा नवीन नोंदणी करणे हे कंत्राटी कर्मचारी करत आहेत. pcpndt कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विधिज्ञामार्फत केली जाते. पण सिव्हिल सर्जननी हे सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी कामकाज सुरू ठेवला आहे.
सोलापुरातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या मेडिकल बिलांच्या फाईली मंजूर करण्याकरता विश्वासु व्यक्ती मार्फत टक्केवारीचा बाजार सुरू केला असल्याची चर्चा आरोग्य कर्मचाऱ्यांत रंगली आहे. सिव्हिल सर्जन कार्यालया अंतर्गत असलेले जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी हाताची घडी तोंडावर बोट अशा परिस्थितीत आहेत,मात्र दबक्या आवाजात हास्यास्पद चर्चा करत आहेत.
एका कंत्राटी कर्मचाऱ्याला मेडिकल बिलांचं कामकाज देऊन डोम कावळ्यामार्फत टक्केवारी वसूल केली जात आहे. डोम कावळा बारीक शिलाई करत,रोजच्या रोज खिसा गरम करत आहे. या सर्व बाबी उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार यांना माहिती आहेत,परंतु ते कारवाई करत नाहीत,असा सवाल अनेकदा आरोग्य कर्मचारी दबक्या आवाजात एकमेकांना करतात.
