कलबुर्गी : दि.१५ (प्रतिनिधी, कर्नाटक) धार्मिक मठाचे स्वामी म्हणून धर्माची शिकवण देताना भक्तांसाठी आदर्श मानल्या जाणाऱ्या स्वामीजींचा रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला असून त्यामुळे साहजिकच भक्तांचा संताप अनावर झाला आहे.
उज्जैन जगद्गुरू पंचाचार्य पिठाचे शाखा मठ असलेले कर्नाटक राज्यातील कलबुर्गी जिल्हातील अफजलपूर तालुक्यात उडचण गावातील सुप्रसिद्ध श्री शंकरलिंगेश्वर संस्थान बृहन्मठचे मठाधिपती श्री शांतलिंग शिवाचार्य यांचा ८ जानेवारी रोजी इंडी मध्ये मद्य प्राशन करुन अनेकांशी वादविवाद झाल्यानंतर भांडण करुन जाताना अनेक गाडयांना ठोकले तेथून पळ काढत सालोटगी येथे लोकांनी पकडले. जास्त मद्य प्राशन केल्याने आणि रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवल्याने अपघात झाला होता. त्यानंतर पळून जात असताना अर्धे कपडे घालून फिरणाऱ्या स्वामीजींना पकडून जनतेने माहिती विचारली असता त्यांनी खोटी माहिती देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र जनतेने त्यांना जाऊ दिले नाही,त्यांना चालत बोलता येत नव्हते. शाळेच्या मुलांनी स्वामींचे व्हिडीओ व फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केलेले आहे. या घटनेची माहिती मिळताच उडचण ग्रामस्थांनी इंडी तालुक्यांतील सालोटगी गावात जाऊन जनतेशी समेट घडवून 22 हजारांचा दंड भरून स्वामीजींना सोडवून घेतल्याचे सांगण्यात येते.
मागच्या महिन्यात - स्वामीजींचे एका गावकऱ्याशी भांडण झाले. स्वामीजी मठात दारू पीत असल्याचे ग्रामस्थांना सांगितल्यावर ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी स्वामींवर खोटे आरोप करत आहात का,अशी विचारणा करत त्या व्यक्तीवर हल्ला केला होता.
स्वामीजींचे परवाना पिस्तूल अफजलपूर पोलिसांच्या ताब्यात - अफझलपूर तालुक्यातील उडचण गावातील श्री शांतलिंग शिवाचार्य यांनी त्यांच्या नावावर परवाना घेऊन पिस्तुल मिळवले होते पण आता ते पोलिसांच्या ताब्यात आहे. स्वामीजी मठात चालवत असलेली कार सोडून तेथून पळून गेल्याचे कळते.
गावकऱ्यांनी नवीन मठाधीश नेमण्याचा निर्णय घेतला - श्री शांतलिंग शिवाचार्यांच्या वागणुकीला उडचन गावातील ग्रामस्थ कंटाळले आहेत. अशा घटना सातत्याने घडत आहेत, 15 जानेवारी रोजी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने अफजलपूरचे आमदार एम.वाय.पाटील यांची उज्जैनच्या जगद्गुरूंची भेट घेण्याचे ठरवले शांतलिंग शिवाचार्यांना काढून नवीन मठाधीश नेमण्याची मागणी केली आहे. नवीन मठाधिपती नियुक्तीसाठी ग्रामस्थ सभेत ठराव करण्यात आले आहे. या घटनेने पंचाचार्य मठात खळबळ उडाली आहे. शांतलिंग शिवाचार्य स्वामीच्या या कृत्याचा वीरशैव लिंगायत समाजामध्ये संताप व्यक्त होत आहे.
