Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा रुग्णालयात स्मशानशांततेत लूट सुरूच;मला नाही अब्रू मी कशाला घाबरू


सोलापूर : दि.०२ (एमडी२४न्यूज) सोलापूर जिल्हा रुग्णालयात स्मशानशांततेत,लूट  सुरूच आहे. फिटनेस प्रमाणपत्र देणे,काऊंटर सिग्नेचर,मेडिकल सर्टिफिकेट ,मेडिकल बिलांच्या फाईली टक्केवारी घेऊन मंजूर करणे याचे काम नियमितपणे सुरू आहे. मात्र हे कामकाज चक्क एका समाजसेवकाकडून केले जात आहे. राज्य शासनाने एमएसडब्ल्यू शिक्षण झालेल्या एका अधिकाऱ्याची नियुक्ती रुग्णांच्या सेवेकरिता नियुक्ती केली आहे. मात्र सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक महाशयांनी एमएसडब्ल्यू झालेल्या अधिकाऱ्यास भलतेच काम लावले आहे. मला नाही अब्रू मी कशाला घाबरू असे चित्र सोलापूर जिल्हा रुग्णालयात दिसून येत आहे. एमएसडब्ल्यू झालेला तो कर्मचारी/अधिकारी कोण,असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. सोलापूरच्या सिव्हिल सर्जन कार्यालयातील मुख्य सूत्रधार निशाण्यावर आला आहे. याच्या मार्फत जोरदार वसुली सुरू आहे. काव काव करणारा डोम कावळा पण खिसा गरम करू लागला आहे.


मागील पंचनामा भाग-१ मध्ये दररोजच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील प्रतिनियुक्त्या रद्द झाल्या होत्या. उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत पुन्हा एकदा गोरखधंदा सुरू झाला आहे. पत्नीकडून बळ मिळालेल्या त्या अधिकाऱ्याची कॉलर टाईट झाली आहे. पण मांजराला दूध पिताना वाटतय मला कोण पाहत नाही.लवकरच मांजराच्या गळ्यात घंटी बांधली जाणार आहे. बीडचा भूमिपुत्र कोट्यावधी रुपयांची संपत्ती गोळा करून ढेकर घेण्याच्या तयारीत आहे.


डोम कावळा खुशाल चेंडू होऊन फिरू लागला आहे. नाही त्या ठिकाणी नाक खुपसत आहे,आणि मलई खात आहे. या डोम कावळ्याच्या सहायने जिल्हा रुग्णालयातील सर्वधागेदोरे हाती लागत आहेत.हा डोम कावळा पतीपत्नीला घरी पाठवण्यात हातभार लावत आहे. स्मशानशांततेत लूट करू पाहणाऱ्या आरोग्य खात्यातील एमएसडब्ल्यूला त्याचा जॉब प्रोफाइल कायद्याने दाखवून देण्यासाठी लवकरच सामाजिक संघटना आंदोलन करणार आहे. अन्यथा एमएसडब्ल्यूची बदली करा किंवा निलंबित करा अशी मागणी करण्याची तयारी केली आहे.