सोलापूर : दि.०१ (प्रतिनिधी) काँग्रेस यंग सेवा दल ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी भव्य असे काँग्रेस कार्यालय स्थापन केले आहे. भारतीय जनता पार्टीचा गढ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघात हे कार्यालय स्थापन करण्यात आले.
सोलापुरात दोन देशमुखांमुळे बीजेपीची अवस्था डिजेपी झाली आहे. डिजेपीला सोलापुरातून हद्दपार करण्यासाठी चोवीस तास सेवा देणारे काँग्रेस कार्यालय स्थापन केले आहे. राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्याशी देखील व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यालयातून गोरगरीब जनतेला संवाद साधता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी भारतीय जनता पार्टीवत सडकून टीका करत भाजप आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांवर निशाणा साधला आहे.