Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी कार्यकर्ता संमेलन परिषद नाशिक येथे संपन्न

भाजपा महाराष्ट्र आदिवासी कार्यकर्ता संमेलन परिषद नाशिक येथे संपन्न.

नाशिक :  दि.२२ (प्रतिनिधी)  लोकसभेत एस.सी.एस.टी. व मागासवर्गीय आदिवासी यांना संविधान बदलणार म्हणून म.वि.आघाडीचे प्रमुख नेते यांनी चुकीचा अपप्रचार करून सर्वसामान्य जनतेला एक प्रकारे फसवणूकच केलेली आहे. येणाऱ्या विधानसभेतही असाच अपप्रचार करून व तसेच मराठा,ओबीसी,समाजाचा रोष युती सरकारवर करण्याच्या प्रयत्नात असून दोन समाजात तेढ निर्माण करून अशांतता निर्माण करण्याच्या प्रयत्नात असून त्यांच्या कुठल्याही भुलतापांना सर्वसामान्यजनता,दिन दलित ओबीसी आदिवासी मागासवर्गीय यांनी बळी पडू नये. 

युती सरकार हे जनतेच्या मनातील कामे करीत असून सर्वात लोकप्रिय झालेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळेच ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत म्हणून विरोधकांच्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नये हे सरकार फक्त सर्वसामान्य जनतेचे हिताचे कामे करीत आहेत असे अनेक विकासाचे मुद्दे उपस्थित केले आहेत.





महाराष्ट्रातील सर्व प्रमुख कार्यकर्त्याना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री तथा प्रदेश प्रभारी भुपेद्रजी यादव,केंद्रीय संघटन मंत्री शिव प्रकाशजी,आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित,खासदार हिना गावित,अनुसूचित जनजागृती राष्ट्रीय सरचिटणीस खासदार गजेंद्र सिंह पटेल,आमदार गणपत वसवा,गुजरात विधानसभेचे माजी सभापती डॉक्टर निशांत खरे,संपर्कप्रमुख राहुल कुलकर्णी,गणेश ठाकूरजी,भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश अध्यक्ष उत्तमराव इंगळे, महामंत्री सुदर्शन शिंदे,भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, भाजपाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण,यांच्या प्रमुख उपस्थितीत अपेक्षित उत्तर महाराष्ट्र,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र,ठाणे,मुंबई,येथील प्रदेश मोर्चा,जिल्हा कार्यकारी,मंडलध्यक्ष,महामंत्री,विधानसभा क्षेत्र प्रमुख,सर्व आजी माजी आमदार व खासदार,जिल्हा परिषद सदस्य,नगरसेवक,आदींसह प्रमुख कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.