सोलापूर : दि.१३ (प्रतिनिधी) बँक ऑफ इंडिया संचलित बी ओ आय स्टार आरसेटी सोलापूर येथे दिनांक २४ एप्रिलपासून ग्रामीण भागातील महिला व बेरोजगार युवतींसाठी 30 दिवसांचे शिवण फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण सुरू होत आहे. या प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य, प्रशिक्षणार्थीची निवास व भोजनाची व्यवस्था पूर्णपणे मोफत आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील दोन वर्षे पाठपुरावा करून व्यवसाय उभारणीस मदत करण्यात येते. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी हा सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असावा व त्याचे वय १८ पुर्ण व ४५ वर्षाच्या आतील असावे. तरी इच्छुक प्रशिक्षणार्थींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आपली नोंदणी दिनांक २३ एप्रिल २०२३ पर्यंत ९२७२२०७११९ या क्रमांकावर करावी, असे आवाहन संचालक दीपक वाडेवाले यांनी केले आहे.
संपर्कासाठी पत्ता - स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (बँक ऑफ इंडिया), गट नं-११, एस आर पी एफ कॅम्प समोर, विजापूर रोड, सोलापूर-४१३००८. संपर्क क्र. ९२७२२०७१११