सोलापूर : दि.१४ (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना मोफत व्यवसाय प्रशिक्षण देवून उद्योग व्यवसायाकडे वळविण्याच्या हेतूने सुरु असलेल्या बँक ऑफ इंडिया संचलित ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अर्थात (आरसेटी) मध्ये या वर्षी जवळ जवळ ३० व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणारे असून,सर्व मोफत निवासी स्वरुपाचे असणार आहेत. यामध्ये युवतींसाठी शिवणकला, ब्युटीपार्लर,ज्युट प्रॉडक्ट उदयमी,वस्त्र चित्रकला,ज्वेलरी बनविणे तसेच युवकांसाठी दुचाकी दुरुस्ती,मोबाईल रिपेअरिंग, फोटोग्राफी आणि विडिओग्राफी व शेतीपूरक प्रशिक्षण शेळीपालन, दुग्धव्यवसाय व गांडूळखतनिर्मिती अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण वर्षभर चालणार आहेत.
या सर्व प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य,प्रशिक्षणार्थ्याची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था पुर्णपणे मोफत आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील दोन वर्षे पाठपुरावा करुन व्यवसाय उभारणीस मदत करण्यात येते. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी हा सोलापुर जिल्हयातील ग्रामीण भागातील असावा व त्याचे वय १८ पुर्ण व 84 वर्षाच्या आतील असावे. (अधिक माहितीसाठी संपर्क: ९२७२२०७१११) तरी सर्व ग्रामीण भागातील युवक युवतींना या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संचालक दिपक वाडेवाले यांनी केले आहे.