सोलापूर : दि.१३ (प्रतिनिधी) रोजगार मेळावा -2023 मोहिमे अंतर्गत पंतप्रधान,नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 71 हजार युवकांना नियुक्ती पत्र प्रदान केले.या मोहिमे अंतर्गत केंद्र सरकारच्या विविध विभागामध्ये एकुण 10 लाख नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या आणि नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान 'रोजगार मेळा' सुरू केला गेला.
नरेंद्र मोदी,पंतप्रधान यांनी 13 एप्रिल 2023 रोजी सुमारे 71,000 नियुक्ती पत्रे नव्याने भरती झालेल्यांना वितरित केली. समारंभादरम्यान, देशभरात 45 ठिकाणी नव्याने नियुक्ती झालेल्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. संबंधित रेल्वे झोन आणि इतर मंत्रालये जे भरती मोहिमेचा भाग होते ते देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सामील झाले.
उमेदवारांचे अभिनंदन करताना पंतप्रधान म्हणाले की उमेदवार आता देशाच्या विकासात योगदान देऊ शकतात आणि 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या उद्दिष्टाचा भाग बनू शकतात. त्यांनी नवीन नियुक्त केलेल्यांना त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला विराम देऊ नये असे आवाहन केले ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म "कर्मयोगी" मध्ये सामील होऊन त्यांची कौशल्ये सुधारण्यासाठी त्यांना सल्ला दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानंतर सोलापुर रेल्वे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या हस्ते 95 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले. उमेदवारांना संबोधित करताना नीरज कुमार दोहरे यांनी नवनियुक्त उमेदवारांचे अभिनंदन करताना रेल्वेसाठी कठोर आणि प्रामाणिक पणे काम करण्याचा सल्ला दिला. यावेळी शिवाजी कदम वरिष्ठ संरक्षा अधिकारी यांनी रेल्वेच्या संरक्षे विषयी मार्गदर्शन केले आहे.
या प्रसंगी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेन्द्र सिंह परिहार,वरिष्ठ विभागीय कर्मिक अधिकारी जी.पी.भगत, वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक एल.के.रनयेवले,वरिष्ठ संरक्षा अधिकारी शिवाजी कदम,मंडल कर्मिक अधिकारी मछिन्द्र गळवे,वरिष्ठ मंडल अभियंतामहंमद फैज,वरिष्ठ मंडल विद्युत अभियंता अभिषेक चौधरी,अभियंता सी.एम.तिवारी,मंडल अभियंता हेमंत कुमार शर्मा सहाय्यक कार्मिक अधिकारी सुधिर खोत आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य कल्याण निरीक्षक अजय सावंत,अक्षय गर्दने,तथा अन्य कर्मचारी गण,ब्रम्हय्या, नागेश नवले,संजीव कुमार यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी,सुधिर खोत यांनी केले.