सोलापूर : दि.०५ (प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज शासकीय मैदान नेहरूनगर येथे भव्य शालेय स्तरावर फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्घाटन महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा संघटक स्काऊट श्रीधर मोरे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे, सहाय्यक संशोधन अधिकारी विशाल मडके, तालुका क्रीडा अधिकारी सत्तेन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची प्रास्तावना महापालिकेचे क्रीडा अधिकारी नजीर शेख यांनी केले. ही फुटबॉल स्पर्धा पाच दिवस चालणार असून यामध्ये सोलापूर महानगरपालिका शहर हद्दीतील शाळेतील उर्दू मराठी इंग्रजी कन्नड इत्यादी सर्व शाळांचे सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे 14 वर्षाखालील मुले व 17 वर्षाखालील मुले तसेच 17 वर्षाखालील मुली यांची सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल चषक स्पर्धेचे आज सदरची स्पर्धा शासनाकडील क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मान्यतेने व सोलापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आल्या आज 14 वर्षाखालील मुले यांची स्पर्धा सध्या चालू असून यामध्ये एकूण 19 शाळेचे संघ सहभाग झाले आहेत.
