Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तुळजाभवानी मातेला साकडे.


आगामी सर्व निवडणुकांमध्ये भगवा फडकू दे,उद्धव ठाकरेचा डंका सर्वत्र वाजू दे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तुळजाभवानी मातेला साकडे.                    

सोलापूर : शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिका,नगरपालिका,जिल्हा परिषद,पंचायत समिती या सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची व उपनेत्या अस्मिता गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली या अनुषंगाने शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी पदाधिकाऱ्यांसह तुळजापूर येथे जाऊन,महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन तुळजाभवानी चरणी आगामी प्रत्येक निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला यश मिळावे व मुंबई सोलापूर संभाजीनगर महापालिका सहित राज्यातील सर्व महापालिका नगरपालिका पंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व निवडणुकांमध्ये यश यावे असे साकडे घातले.

यावेळी शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख संतोष पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले धाराशिव महिला जिल्हा संघटिका शामल वडणे पवार,माजी उपजिल्हाप्रमुख श्याम पवार,खंडू सलगर,संतोष घोडके आदी पदाधिकारी उपस्थित होते. धाराशिव विश्रामगृह येथे उपनेत्या अस्मिता गायकवाड व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते यांचे स्वागत करून यथोचित सत्कार केला, त्यावेळी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी बद्दल ही निवेदन देऊन अनेक पदाधिकारी व शेतकरी यांनी निवेदन देऊन व्यथा मांडल्या,यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.