सोलापूर : दि.१२ (प्रतिनिधी) सहायक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर या कार्यालयाचे शासकीय वाहन टाटा सुमो क्रमांक एम.एच.११ एबी-०१८५ (वाहनाचे मॉडेल - टाटा सुमो Victa CX, क्षमता - ९, नोंदणी दिनांक - २९ मे २०१०) हे शासकीय वाहन शासकीय कामकाजासाठी वापरण्याचा कालावधी १० वर्षापेक्षा जास्त झालेला असल्याने शासन निर्णयानुसार वाहन निरुपयोगी ठरवून निर्लेखित करण्यात आलेले आहे.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांनी शासकीय वाहनाचे मूल्यांकन अंदाजित 1 लाख 25 हजार ते 1 लाख 35 हजार इतके असल्याबाबत कळविलेले आहे. त्यानुसार शासकीय वाहन टाटा सुमो क्रमांक एम.एच.११ एबी-०१८५ या शासकीय वाहनाचे दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सातरस्ता, सोलापूर येथे लिलाव पध्दतीने विक्री करण्यात येणार आहे. इच्छुकांनी लिलावास उपस्थित राहण्याचे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
